बीडबीड जिल्हा

आमदाराच्या आघाडीला मोठा सुरुंग

चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

आमदाराच्या आघाडीला मोठा सुरुंग

चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

बीड- विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झाल्यानंतरही बीड शहराचा आणि मतदारसंघाचा विकास केवळ बोलल्या पुरतात राहिला विधानसभेच्या निवडणुकीत ज्या शिलेदारांनी आ संदीप क्षीरसागर यांना आमदार केले त्याच शिलेदारांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला काही दिवसापूर्वी एका नगरसेवकाने प्रवेश केल्यानंतर आज परत चार नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे आमदाराच्या आघाडीला मोठा सुरुंग लागला आहे

एक वर्ष ही झाले नाही अशा स्थितीत मुख्य शिलेदारांना सापत्न वागणूक मिळू लागल्यामुळे आघाडीच्या चार नगरसेवकांनी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करून आघाडीला मोठा सुरुंग लावला आहे काही दिवसापूर्वीच बाळासाहेब गुंजाळ यांचा प्रवेश झाला होता त्यानंतर आज नगरसेवक गणेश तांदळे प्रभाकर पोपळे रणजित बनसोडे भैय्यासाहेब मोरे यांनी आज नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर डॉ योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे यावेळी प्राध्यापक जगदीश काळे दिलीप गोरे दिनकर कदम विलास बडगे ज्येष्ठ नेते मोईन मास्टर गणपत डोईफोडे सादेक जमा दादासाहेब मुंडे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते आमदाराला लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी याच शिलेदारांनी दिली परंतु पदावर गेल्यानंतर चारही नगरसेवकांना सापत्न वागणूक मिळू लागली सन्मानाची वागणूक व कार्यकर्त्यांची भावना जपणारे नेतृत्व म्हणून जयदत्त क्षीरसागर आणि डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते हा विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे आघाडीत उभी फूट पडली आहे अर्धी आघाडी फुटली असून आघाडीच्या 20 नगरसेवकांपैकी 8 नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे तर आणखीही काही जण नाराज आहेत
यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की राजकारणात काम करत असताना आपल्या परंपरेत राहूनच काम करावे लागते घरात मोठ्यांचा सन्मान ठेवणे ही संस्कृती आहे पदासाठी रक्ताची नाती तोडणाऱ्यांनी जनतेचे भले केलेले कधी कुणी पाहिले आहे का असा सवाल करत 35 वर्षापासून मी नगराध्यक्ष आहे मलाही आमदारकीसाठी आडून बसता आले असते पण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या मोठ्यांचा मान राखायला हवा स्वकर्तुत्वाने राजकारणात यश मिळवावे लागते ज्यांच्या बोटाला धरून आपण मोठे होतो त्यांच्याशी बेईमानी करून जनाधार मिळत नसतो अण्णा सारखे शांत संयमी आणि कार्य कर त्यावर जीवापाड प्रेम करणारे नेतृत्व असल्याने मला पदाचा कधीही मोह पडला नाही जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पडली ज्यांनी आज प्रवेश केला आहे त्यांना आम्ही कुटुंबातील सदस्याप्रमाणे सन्मानाची वागणूक देऊ, आपण तरुण नगरसेवक आहात भविष्यातील चांगले नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते सर्वांना बरोबर घेऊन शहराचा आणि मतदारसंघाचा विकास करूया आणि पुन्हा एकदा चुका सुधारून मतदारांचा विश्वास संपादन करूया असे आवाहन त्यांनी केले
यावेळी डॉ योगेश क्षीरसागर म्हणाले की आघाडीचा भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे त्यामुळे आता विद्यमान आमदाराने आपल्या आघाडीत अर्धे तरी नगरसेवक आपल्या बाजूने आहेत का हे दाखवून द्यावे आंबेडकरांची फसवणूक करून विकासाच्या नावाने केवळ थापा मारल्या एक वर्ष झाले तरी एकही नारळ फुटला नाही आम्ही जवळचा लांबचा न पाहता विरोधी नगरसेवकांच्या वार्डात सुद्धा रुपयांची कामे करून दाखवले आहेत केवळ विकास कामांच्या मुद्द्यावरच आज या नगरसेवकांनी प्रवेश केला आहे त्यामुळे आगामी काळात मतदारांनी देखील सावध भूमिका घेऊन विकास कामे करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे असे ते म्हणाले यावेळी चारही नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button