गेवराईबीड जिल्हा

स्वाभिमानी युवा ब्रिगेड आयोजित राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळा २०२१ च्या नुतन कार्यकार्यकारणीची निवड

नुतन कार्यकारणीचा विजयसिंह पंडित यांच्या हस्ते सत्कार

गेवराई ,  दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचा निर्णय आयोजक तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी घेतला असून आज गेवराई येथील कृष्णाई निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीत राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळा २०२१ ची नुतन कार्यकारणी जाहिर करण्यात आली. यावेळी नुतन कार्यकारणीचा विजयसिंह पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळा समितीची नुतन कार्यकारणीची घोषणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आली. अध्यक्षपदी किशोर कांडेकर,  कार्याध्यक्षपदी दिनेश घोडके, सह कार्याध्यक्ष ऋषिकेश मोटे, उपाध्यक्ष युवराज नागरे, उपाध्यक्ष आनंद दाभाडे, उपाध्यक्ष नविद फारोकी, सचिव सय्यद नौशाद, सह सचिव करण सुतार, कोषाध्यक्ष अमित वैद्य,  सह कोषाध्यक्ष विजय सुतार यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते नुतन कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमाचे पालन करुन शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचा निर्णय विजयसिंह पंडित यांनी यावेळी घेतला.

या बैठकीला महंमद गौस, शांतीलाल पिसाळ, सय्यद नजिब, शेख खाजाभाई, ऋशिकेश बेदरे, शाम येवले, दिपक आतकरे, भाऊसाहेब माखले, अक्षय पवार, दत्ता पिसाळ, जिजा पंडित, जयसिंग माने, भागवत दहिवाळ, रवि दाभाडे, गोरख शिंदे, सदा वादे, बब्बु बारुदवाले,सुभाष गुंजाळ, विलास ठाकुर, गौतम कांडेकर, धम्मपाल भोले, वसीम फारोकी, अवेज शरीफ, दत्ता दाभाडे, शेख मन्सुर, सय्यद अल्ताफ. अदित्य दाभाडे, अविनाश मोटे, कांता नवनुते, सुंदरबप्पा काळे, पप्पु भुते यांच्यासह शहरातील शिवप्रेमी नागरीक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button