गेवराईबीड जिल्हा

रोहयो मंत्री संदिपान भुमरे पाटील यांची दैठण येथे सदिच्छा भेट

गेवराई रोजगार हमी योजनेच्या विविध कामांचा घेतला आढावा

गेवराई : महाराष्ट्र राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पाटील यांनी तालुक्यातील दैठण येथे शुक्रवार दि.२९ रोजी सदिच्छा भेट देवून तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांचा दैठण नगरीत भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बीड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री शिवाजीराव दादा पंडित, गेवराई तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन संभाजीराव पंडित, दैठणचे सरपंच प्रतापसिंह पंडित, केज पंचायत समितीचे उपसभापती ऋषीकेश आडसकर यांच्या सह आदि उपस्थित होते.
गेवराई तालुक्यातील दैठण येथे शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पाटील यांनी दि.२९ रोजी शुक्रवारी सदिच्छा भेट देवून तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी तहसिलदार सचिन खाडे, तालुका कृषी अधिकारी बी.टी. सोनवणे, मंडळ कृषी अधिकारी हर्षवर्धन खेडकर, कृषी सहाय्यक दिपक राठोड, गणेश वाणी, रेवकी अर्बनचे चेअरमन विलास देवकते, सुंदरबप्पा पंडित, चंद्रकांत पंडित, पंजाबराव पंडित, उपसरपंच अजित पंडित, शिवसेना उप तालुकाप्रमुख धर्मराज आहेर, सामाजिक कार्यकर्ते गजानन काळे, कृ.उ.बा.समितीचे संचालक अशोक बोरकर, ग्रामसेवक प्रतिक घाडगे,पाचोडचे नवनिर्वाचित सरपंच शिवराज भुमरे, हिंगणगावचे सरपंच त्रिबंक मदने, आंतरवालीचे सरपंच किरण वावरे, सरपंच सुंदर तिवारी,बोरगाव थडी सरपंच मैद, मिरगाव सरपंच प्रल्हाद गोडबोले, रेवकीचे माजी सरपंच रोहिदास सौंदलकर प्रकाश वाघमारे, डाॅ.रामकिशन वावरे यांच्या सह आदि उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button