बीडबीड जिल्हा

श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटकडून मयत खातेदाराच्या वारसाला ४००००० रुपयाची आर्थिक मदत

श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटकडून मयत खातेदाराच्या वारसाला ४००००० रुपयाची आर्थिक मदत

बीड प्रतिनिधी श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट बीडच्या शिवाजीनगर शाखेचे खातेदार श्री थोरात गणपत दशरथ यांचे अपघाती निधन झाले आहे.त्यामुळे त्यांचे वारसदार अभिषेक गणपत थोरात यांना दि २६ जानेवारी २०२१ रोजी संस्थेच्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये माजी आमदार श्री अमरसिंह (भैय्यासाहेब)पंडित यांच्या हस्ते ४००००० चार लक्ष रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब, प्रशिक्षक नितीनजी वाणी सर, श्री शिवाजीराव जाधव माजी नगरसेवक, श्री सुभाष अप्पासाहेब उगले संचालक, श्री लक्ष्मण विक्रमराव परभणे उपस्थित होते.
संस्थेविषयी आपले मनोगत व्यक्त करताना अमरसिंह (भैयासाहेब)पंडित म्हणाले कि श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटचे अध्यक्ष शाहिनाथ विक्रमराव परभणे यांनी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक सेवा करन्याचे काम केले असून नक्कीच त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या मुख्यकार्यालयासह एकूण २० शाखा असून त्याच्या सर्व शाखामध्ये ठेवीदार व खातेदार यांचा इन्शुरन्स काढला जातो त्यामुळे यासंस्थेमध्ये खातेदाराच्या पैशासोबत खातेदाराचीही काळजी घेतली जाते त्यामुळे श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटचे खातेदार व ठेवीदार त्यांच्या पैशासह स्वतः सुरक्षित आहेत.यावेळी संस्थेचे सर्व संचालक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button