बीडबीड जिल्हा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारकडून समितीची स्थापना – अण्णा हजारे यांचे आंदोलन मागे

बीड,ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिनांक ३० जानेवारी २०२१ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यानंतर केंद्र सरकारने यावर कारवाई करण्यासाठी व चर्चेसाठी समितीची स्थापना केली. आता ही समिती सहा महिन्यात सर्व प्रश्नांवर निर्णय घेणार आहे. त्यामुळे अन्नाचे उद्याचा आंदोलन टळले आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचे वेगवेगळे १६ प्रश्न अण्णांनी उपस्थित करून शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर केंद्र सरकारला धारेवर धरले होते. यानंतर आज भ्रष्टाचार जन आंदोलनाच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली.

केंद्रीय कृषिमंत्री कैलास चौधरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन आणि अन्य काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अण्णांनी बैठक घेऊन या प्रश्नांवर आपली भूमिका केंद्र सरकारकडे मांडली. बैठक खूप वेळ चालली.

शेतकऱ्यांच्या विविध १६ प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी स्थापन झालेल्या या समितीचे अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर, कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, निती आयोगाचे अध्यक्ष, आणि अन्य अण्णा हजारे सुचवतील अशा चार जनांचा यात समावेश असणार आहे. समिती सहा महिन्यात आपले काम पूर्ण करणार आहे. आणि याच कालावधीमध्ये सर्व प्रश्न मार्गी लागणार आहे.

याच बरोबर लोकायुक्त आणि लोकपाल यासंदर्भात देखील चर्चा झाली. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी देखील करण्याचा प्रयत्न करण्याचे सरकारने मान्य केला आहे. त्यामुळे अण्णांचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, याची कार्यकर्त्यांनी देखील दखल घ्यावी, असे जन आंदोलनाचे विश्‍वस्त अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button