बीडबीड जिल्हा

स्वराज्य नगर अंतर्गत रस्ते नाल्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करा, अन्यथा शिवसंग्रामच्या वतीने तीव्र आंदोलन करणार-अक्षय माने

बीड ,गेली पंचवीस वर्ष नगरपरिषदेची सत्ता क्षीरसागर यांच्या कडे आहे, एकदा निवडणूक झाली की परत चार वर्ष या प्रभागांकडे डुंकूनही पाहायचं नाही आणि निवडणूक जवळ आली की विकास कामे सुरू करण्याचा आव आणण्याचे काम क्षीरसागरांच्या वतीने करण्यात येते.

बीड शहरातील मध्यभागी असणाऱ्या स्वराज्य नगर ह्या भागात सर्व रस्ते करुन ठेवले आहेत. या भागात उच्चभू ते सर्वसाधारण लोक राहतात परंतु या भागातील लोकांच्या मागणीकडे बीड नगर परिषदेने दुर्लक्ष केले आहे. स्वराज्य नगर हा भाग गेली पंचवीस वर्ष क्षिरसागर यांना निवडून देत आहे परंतु इथला विकास क्षिरसागर यांना करता आला नाही. रस्ते नाल्या सोबत स्वच्छतेचाही अभाव इथे मोठ्या प्रमाणात आढळून येतो. रहदारी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता उरलेला नसल्याने येथील लोकांची ये जा करण्यासाठी तारांबळ होत आहे. स्वराज्य नगर या भागात क्षीरसागर यांनी ह्याच प्रकारे लोकांना गृहीत धरून फसवण्याचे काम केले आहे.
शिवसंग्रामच्या वतीने अक्षय माने यांनी अनेक वेळा नगरपरिषदेला निवेदन देऊन विनंती करून देखील इथले काम सुरू करण्यात आले नाही. लवकरात लवकर रस्ते व नाल्यांची कामे सुरू करून ती पूर्ण करावेत अन्यथा शिवसंग्रामच्या वतीने आंदोलन करणार असे निवेदन शिवसंग्राम चे अक्षय माने यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button