केजबीड जिल्हा

केज- कळंब रोडवर दोन मोटारसायकल आणि ट्रॅक्टरच्या तिहेरी भिषण अपघात : दोघे गंभीर जखमी.

पुन्हा १०८ लवकर पोहोचली नाही !

केज ,महादेव काळे

केज- कळंब रोडवर केज पासून दोन कि.मी. अंतरावर दोन मोटारसायकल व ट्रॅक्‍टरचा तिहेरी अपघात होऊन त्यात दोन्ही मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाले आहेत.

या बाबतची अधिक माहिती अशी की, दि. १ फेब्रुवारी सोमवार रोजी सायंकाळी ६:०० वा. केज-कळंब रोडवरील नवीन पेट्रोल पंपाजवळ होंडा शाईन मोटार सायकल (क्र.
एमएच २३/एचके७८८९) आणि बजाज डिस्कव्हर (एमएच ४४/एन५१४६) यांची समोरा समोर धडक झाली. त्या नंतर त्यांचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टर (ट्रॉली नं. एमएच ३३/४८६३) ला एकजण धडकला त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर देखील रस्त्याच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाले. या अपघातात बंडू जाधव वय ४९ वर्ष रा. शेलगाव गांजी ता. केज आणि गणेश बंडू खरमाटे वय ४० वर्ष रा. भोई गल्ली कळंब हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. बंडू जाधव यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. तर गणेश खरमाटे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघाताची माहिती रस्त्याने पायी फिरणारे इंदानी यांनी पोलीस व रुग्णवाहिका यांना कळविले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, शिवाजी शिनगारे, अमोल गायकवाड, जिवन करवंदे, अशोक गवळी, अनिस शेख, हनुमंत चादर, राहुल नाडागुडे, चालक हनुमंत गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे हलवण्यात आले आहे.

पत्रकारांची कामगिरीही तितकीच मोलाची

या अपघाताची माहिती मिळताच केज तालुक्यातील दक्ष पत्रकार म्हणून संबोधले जाणारे आदर्श पत्रकार समितीचे एक आदर्श पत्रकार आणि क्राईम न्युजशी निगडित असलेले मा.गौतम बचुटे यांनी घटनेची माहिती मिळताच पत्रकार महादेव काळे यांना घेवुन घटनास्थळी धाव घेतली. व परिस्थितीचा आढावा घेऊन धावपळ करून रूग्नवाहिका ऊपलब्ध केली. त्यामुळे अपघातग्रस्तांना मदत मिळाली.

पुन्हा १०८ लवकर पोहोचली नाही !

अपघातातील जखमींना तात्काळ उपचार करता येण्यासाठी १०८ या रुग्णवाहिकेस संपर्क केला. मात्र रुग्णवाहिका येण्यास विलंब लागत असल्यामुळे रमेश तात्या गालफाडे मित्र मंडळाची रुग्ण वाहिका तात्काळ बोलावून त्यातून एका जखमीस रुग्णालयात नेण्यात आले.

 

 

 

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button