जालना

सभापती रंगनाथराव येवले यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना मास्क वाटप

आष्टी/ प्रतिनिधी
गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा नुकत्याच चालू झाल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून परतुर पंचायत समिती सभापती रंगनाथराव येवले यांनी दि.02 रोजी काऱ्हाळा जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5 वी ते 8 वी च्या उपस्थित सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांना मास्क चे वाटप केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून काऱ्हाळा पंचायत समिती गणातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना या मास्कचे वाटप त्यांच्या वतीने करण्यात येत आहे.त्यांच्या या उपक्रमाचे गावातील नागरिक व शिक्षक यांनी कौतुक करत आभार मानले.यावेळी शाळेतील शिक्षक मुजमुले सर,मोरे सर,दारसेवाड सर,आढे सर,भद्रगे सर व बाळासाहेब सोळंके यांची उपस्थिती होती.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button