केजबीड जिल्हा

केज-अंबाजोगाई रोडवर उपजिल्हा रुग्णालय समोर एसटीने चिरडून एका वृद्द महिलेचा जागीच मृत्यू.

केज,केेज येथील उपजिल्हा रुग्णालया समोर एका वृद्ध महिलेच्या डोक्यावरून एसटी बसचे मागचे चाक गेल्यामुळे तिच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.

या बाबतची माहिती अशी की, दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी १:३० वा. केज येथील बिड अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर उपजिल्हा रुग्णालया समोर बीड आगराचे अंबाजोगाई कडून बीडकडे जाणाऱ्या अंबाजोगाई-बीड या शिवशाही एसटी बस क्र. (एम एच-०९/ एफ एल-१०४२) च्या झालेल्या अपघातात काशीबाई रामभाऊ थोरात वय ६५ वर्षे या महिलेच्या डोक्यावरून बसचे मागचे टायर गेल्यामुळे तिची कवटी फुटून चेंदामेंदा होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान या अपघाता बाबत प्राप्त महिती अशी की, मयत काशीबाई रामभाऊ थोरात या एका रिक्षात बसून गावाकडे जात होत्या. त्या वेळी रिक्षा एसटी बसला ओलांडून जात असताना काशीबाई थोरात यांचा तोल जाऊन एसटीच्या टायरखाली आली असावी.
या प्रकरणी बीड आगराचे चालक कल्याण डोंगरे हे स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले. या अपघाताची पुढील चौकशी सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे करीत आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button