गेवराईबीड जिल्हा

अमरसिंह पंडित यांच्या आश्वासनानंतर वडार समाजाने उपोषण सोडले

गेवराई नगरपरिषदेने उपोषणाकडे केले दुर्लक्ष

गेवराई,गेवराई शहरातील वडार समाजाने स्मशानभूमीसह ईतर मागण्यांसाठी गेवराई नगर परिषद आणि आ. लक्ष्मण पवार यांच्या निषेध करुन नगर परिषदेसमोर महिलांसह उपोषण सुरु करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिलेल्या आश्वासनानंतर वडार समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सोडले.

गेवराई शहरातील संजयनगर भागामध्ये वडार समाज मोठ्या प्रमाणावर असुन या भागातील वडार समाजाच्या वतीने आपल्या प्रमुख मागण्यांसाठी दि. ०१ फेब्रुवारी पासुन नगर परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. वडार समाजासाठी स्मशानभुमीची मागणी तसेच संरक्षक भिंत, रस्ता, लाईट तसेच पाण्याची सोय आदी प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. नगर परिषदेच्या प्रशासनाने दुसर्‍या दिवशीही उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी स्मशानभुमी संरक्षक भिंत तसेच रस्ता, लाईट व पिण्याच्या पाण्यासाठी टप्या-टप्याने निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लिंबू शरबत घेवून वडार समाजाने उपोषण सोडले. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी वडार समाजाच्या आमरण उपोषणाची दखल घेवुन निधी उपलब्ध करुन देणार असल्यामुळे वडार समाजाने अमरसिंह पंडित यांचे आभार मानले आहेत.

यावेळी अ‍ॅड. सुभाष निकम, कडुदास कांबळे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी नगरसेवक राधेशाम येवले, दादा घोडके, दत्ता दाभाडे, संदिप मडके, माजी नगरसेवक सय्यद एजाज, अमित वैद्य, ऋषिकेश सिरसट यांच्यासह वडार समाजाचे गेवराई तालुकाध्यक्ष सुभाष गुंजाळ, विलास गुंजाळ, प्रकाश उपळकर, अर्जुन गुंजाळ, पंढरीनाथ मोरे, अमोल पवार, प्रकाश गुंजाळ, मोहन गुंजाळ, कैलास गुंजाळ, विष्णू मोरे, सुभाष उपळकर, राम गायकवाड, रमेश चव्हाण, सतिष पवार, शिवाजी गुंजाळ, जयश्री गुंजाळ, छाया गुंजाळ, अंबिका गुंजाळ, जयश्री चव्हाण, देवुबाई चव्हाण, विमल पवार, सुमन गुंजाळ, सुमन उपळकर, अनिता गुंजाळ, सुरेखा गुंजाळ, सत्यशिला चव्हाण, सुमन धनवटे, सुरेखा गुंजाळ,  मिरा गुंजाळ  यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button