बीडबीड जिल्हा

बीड : तीच क्रेझ, तोच कामांचा धडाका धनंजय मुंडे यांच्या बीडमधील जनता दरबारास तुफान गर्दी!

शेवटच्या माणसाचे समाधान होईपर्यंत थांबणे हे माझे कर्तव्यच - धनंजय मुंडे

बीड — : बीड जिल्ह्यातील पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित केलेल्या जनता दरबारास स्थानिक नागरिकांची तुफान गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. लोकांमध्ये आपले प्रश्न, आपल्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून मुंडेंचीच प्रचंड क्रेझ असल्याचे जमलेल्या गर्दीवरून दिसून आले.

पक्षप्रमुख खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालेला जनता दरबार मुंबई, परळी पाठोपाठ आता जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीड येथे भरवत आहोत, यापुढे दर महिन्याला किमान एकदा हा दरबार आयोजित करून सामान्य नागरिकांचे प्रश्न व समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी याचे आयोजन केल्याचे ते म्हणाले.

सामान्य माणसाचे जनता दरबाराच्या माध्यमातून समाधान करून, आपले काम होईल या अपेक्षेने आलेल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणे हे आमचे कर्तव्यच आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले, जनता दरबार नंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

बीड तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून लोक आपले प्रश्न, निवेदने घेऊन भेटण्यासाठी येत होते, जवळपास 3 तास चाललेल्या या जनता दरबारात अनेकांनी आपले प्रश्न मांडले व त्यातील बऱ्याच जणांना मुंडेंच्या कार्यशैलीमुळे जागच्या जागीच समाधानही मिळाले. यावेळी मुंडे यांच्यासह, बीडचे आ. संदीप क्षीरसागर, रा.कॉ. चे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. प्रा. सुनील दादा धांडे यांसह पदाधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रेल्वे कृती समिती, संपादक मंडळी यांच्याही प्रश्नाबाबत चर्चा झाली.

*…त्या आजोबांचे काम आणि धनंजय मुंडे यांनी सांगितली ओळख! चहा पीत पीत आजोबांचे कामही झाले फत्ते!*

साधारण पावणे तीनच्या सुमारास सुरू झालेल्या जनता दरबारात लोकांचा गराडा, याला फोन लाव, त्याला फोन लाव, याचे पत्र द्या असे मार्गक्रमण सुरू असताना, चहा घ्यायला देखील वेळ मिळाला नाही. त्यातच एक वयोवृद्ध आजोबा आपल्या जमिनीच्या मोजमापाच्या संदर्भातील तक्रार घेऊन आले.

चहाचा एक एक घोट घेत, इतक्या गर्दीतही ना. मुंडेंनी त्या आजोबांना नावाने बोलत, ‘बाबा मला तुमच्या गावच्या कार्यक्रमाला यायचं होतं, पण त्या दिवशी काहीतरी काम निघालं बरका!’ असे म्हणत आजोबांना सुखद धक्काच दिला. लागलीच आपल्या स्वीय सहाय्यकामार्फत सदर आजोबांच्या कामी उपविभागीय अधिकाऱ्यांना बोलून आजोबांचे कामही फत्ते करून दिले; आजोबांनी धनंजय मुंडे यांना आशीर्वाद म्हणून पुस्तक भेट दिली व चेहऱ्यावर समाधान घेऊन गेले!

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button