बीडबीड जिल्हा

श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटला सलग चौथ्यांदा बँको पुरस्कार जाहीर

बीड (प्रतिनिधी)श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी ची स्थापना उद्योजक शाहिनाथ परभणे यांच्या प्रेरणेने 2013 पासून बीड शहरांमध्ये कार्यरत आहे संस्थेने अल्पावधीतच महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. श्री साईराम अर्बन मल्टिस्टेट हि केवळ आर्थिक व्यवहार न करता सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये संस्थेने फार मोठे काम केलेले आहे या वर्षी लॉक डॉन मुळे अनेक लोकांना आर्थिक मदत करणे त्याचबरोबर सामाजिक कार्यात खातेदारांना आर्थिक मदत करणे गुणवंत विद्यार्थी यांना सन्मानित करणे व प्रोत्साहित करणे असे अनेक उपक्रम राबवण्यात येत असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना सन्मानित करणे कृषिरत्न पुरस्कार देऊन गौरव करणे असे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून संस्थेच्या माध्यमातून तत्पर सेवा देण्यासाठी नेहमी अग्रेसर राहून श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट ने मराठवाड्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे या कार्याची दखल घेऊन श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट ला सलग चौथ्यांदा कर्नाटक मधील मैसूर या शहरांमध्ये होत असलेल्या राज्यस्तरीय सहकार परिषदेमध्ये मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे हा पुरस्कार आमचे सभासद, कर्मचारी, संचालक, ठेवीदार ,कर्जदार आणि ग्राहक यांनी टाकलेल्या विश्वासामुळेच मिळालेला असल्यामुळे हा पुरस्कार मी त्यांना अर्पण करतो असे श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष उद्योजक शाहिनाथ परभणे यांनी जाहीर केले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button