केजबीड जिल्हा

केज येथील खळबळजनक घटना ….!

नदीत अनोळखी पुरुष जातीचे सडलेले प्रेत तरंगत असल्याचे आढळून आल्याने ऊडाली खळबळ

केज, (प्रतिनिधी)

केज येथील अल्लाउद्दीन नगरच्या जवळून वाहणाऱ्या लेंडी नदीत एक पुरुष जातीचे प्रेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ६ फेब्रुवारी रोजी शनिवारी केज येथील भिमनगर लगतच्या स्मशानभूमी जवळून वाहणाऱ्या लेंडी नदीच्या पात्रात एक पुरुष जातीचे अंदाजे ४५ वर्ष वयाचे अनोळखी प्रेत पालथ्या अवस्थेत तरंगत असल्याचे आढळून आल्याने खळबळ माजली आहे. शेख युन्नूस चांद व गुलाब गुंड हे दुपारी ४:०० वा. च्या दरम्यान शेतात गेले असता त्यांना प्रेत आढळून आले. त्यांनी याची माहिती केज पोलीस स्टेशनला देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, रुक्मिणी पाचपिंडे, आशा चौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील आय-बाईक विभागाचे कर्मचारी वैभव राऊत व पप्पू अहंकारे हे सर्वजण घटनास्थळावर हजर झाले. प्रेत पाण्याच्या बाहेर काढन्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याची अधिक माहिती व तपास पोलीस करीत आहेत.
सदर घटना ही घातपात की अपघात असल्याचीही शंका व्यक्त होत असून यामुळे खळबळ माजली आहे.

सोबत फोटो.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button