बीडबीड जिल्हा

गुणवत्ता आणि व्यवहारात पारदर्शकता असेल तरच संस्था यशस्वीरीत्या चालतात-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड,उत्तम गुणवत्ता आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता असेल तर अशा संस्था निश्चित प्रगतिपथावर जाऊ शकतात गजानन सहकारी सुत गिरणीने लॉक डाऊन च्या काळातही सात कोटी रुपयांचे सूत निर्यात केले आहे तर संस्थादेखील गुणवत्तेमुळे प्रगतीपथावर आहेत गजानन बँकेच्या माध्यमातून राज्यात आणखी पाच शाखा उघडण्याचा मानस असून याची परवानगी आल्यास लवकरच त्याचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती माजीमंत्री लोकनेते जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे

श्री गजानन सहकारी सुत गिरणी श्री गजानन सहकारी बँक नवगण शिक्षण संस्था आदर्श शिक्षण संस्थेच्या पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्व काकू नाना आणि सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला यावेळी माधवराव मोराळे विलास बडगे अरुण डाके नानासाहेब काकडे दिनकर कदम गणपत डोईफोडे प्रा जगदीश काळे प्रा व्ही एस कंधारे, थिटे ए एस बँकेचे मॅनेजर मन्मथ आप्पा स्वामी,सर व्यवस्थापक एम एस शेख,एम डी विश्‍वनाथ काळे सखाराम मस्के अरुण बोंगाणे राजेंद्र मुनोत देवीलाल चरखा अंकुशराव उगले बालाप्रसाद जाजू विजय सरवदे धनंजय वाघमारे शेख नसीर विश्वंभर सावंत दत्तात्रय डोईफोडे अशोक घुमरे दत्तात्रय आघाव डॉ मन्मथआप्पा हेरकर अरुणराव गोरे जयदत्त थोटे अच्युतराव मुंडे कल्पना शेळके कोंडीराम निकम पांडुरंग होमकर गोरख धंने कल्याण खांडे प्रा राजू मचाले देविदास हसन खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी चारही संस्थेच्या अध्यक्षांनी अहवालाचे वाचन करून प्रास्ताविक केले

यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की यावर्षी की परिस्थिती वेगळीच निर्माण झाली आहे आणखी पूर्ण गेलेला नाही मार्च ते मार्च तब्बल एक वर्ष होत आहे नेक व्यापार्‍यांना फटका बसला अनेक उद्योग धंदे बंद झाले शहरी भागांमध्ये बंद अवस्थेत असलेल्या जनतेला धीर देण्यासाठी अनेक हात पुढे आली लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्येकाला काळजी घ्यावीच लागणार आहे बंद खोलीत असलेल्या जनतेला अन्नधान्य पुरवण्याचे काम शेतकऱ्यांनी केले आहे त्या शेतकऱ्याला आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे कोरोना काळात सर्वसामान्य माणसापासून ते अति श्रीमंत असणाऱ्या माणसाला अनंत अडचणींना सामोरे जावे लागले शहरातून ग्रामीण भागात येत असताना आम्ही प्रत्येकाशी संपर्कात होतो जनतेवर संकट येते तेव्हा आपण गरजेच्या वेळी हजर राहून सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो संकटाच्या वेळी लोकांची मदत केली तर ती लक्षात राहते अडचणीत सापडलेल्या माणसाला आधार देण्याचे काम आपण या चारही संस्थेच्या माध्यमातून केले आहे कोरोणाच्या कठीण काळातही सूतगिरणीने मोठे यश मिळवले आहे झालेल्या उत्पादनाची निर्यात करून या वर्षी 7 कोटी रुपये सूतगिरणीला मिळाले त्यामुळे चालू वर्षी आपण आठ कोटीचे कर्जफेड करू शकलो सध्या 50 लाख रुपयांची नवीन मशनरी आपण खरेदी केली असून चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवल्यामुळेच सुटगिरणी गजानन बँक आणि शिक्षण संस्थांनी उच्च दर्जा प्राप्त केला आहे भविष्यात बँकेचा विस्तार करण्याचा मानस असून आणखी पाच शाखांसाठी आपण परवानगी मागितली आहे 77 कोटी रुपयांच्या ठेवी सध्या बँकेत असून शंभर कोटी ठेवी झाल्यास आणखी गरजूंना कर्ज वाटप करता येईल सोने तारणावर ही आपण अर्धा टक्के व्याज सूट देत आहोत सॅलरी करतातही वाढ करण्यात आली आहे आपल्या सर्व संस्थांच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे संघर्ष सुरूच आहे आणि समर्थपणे कार्य चालू आहे आपला माणूस सांभाळण्याचा प्रयत्न आपण करत असतो संस्थेत काम करणारा प्रत्येक जण मनातून काम करत असतो त्यामुळेच अशा संस्था यशोशिखरावर पोहोचतात असे ते म्हणाले यावेळी चारही संस्थांचे संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन प्रा श्रीराम जाधव जाधव यांनी केले
यावेळी चि पटाईत ओंकार जगन्नाथ, कु पिंगळे सई संजय,कु एडके साक्षी या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button