केजबीड जिल्हा

गावातले तंटे गावातच सामोपचाराने मिटवले जावेत.—उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत.

गावातले तंटे गावातच सामोपचाराने मिटवले जावेत.---उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत.

केज ,(प्रतिनिधी)

शेतीविषयक जमीनीचे वाद गावातले गावातच मिटवले पाहिजेत. बांधावरून होणाऱ्या कुरापती ,घरगुती भांडण तंटे गावात सोडवण्यासाठी सरपंच, पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष आदी प्रमुखांनी गावात सोडवावेत. असे मत व्यक्त केले. युसूफवडगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये बैठकी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांनी व्यक्त केले.
सोमवार रोजी युसूफवडगाव हद्दीतील जि. प. सदस्य, प. स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,पोलीस मित्र आदींची बैठक ठेवण्यात आली होती.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत,युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि आनंद झोटे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना बांधावरून भांडण पोलीस ठाण्याकडे येऊ नये. गावात चोऱ्यांचे प्रमाण कमी व्हावे. यासाठी ग्रामसुरक्षा दल सक्रिय करावे. असे आवाहन करण्यात आले. बैठकीस परिसरातील सर्व गावांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button