केजबीड जिल्हा

नाव्होली येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती ऊत्सव समितीची कार्यकारिणी जाहिर.

अध्यक्षपदी प्रशांत देशमुख तर सचिव पदी तानाजी जगताप यांची निवड.

केज ,(प्रतिनिधी)
सद्या नाव्होली गावातील तरूण पिढी अनेक धार्मिक, सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहाने गावात राबवत असुन त्यांच्या या कार्याला सर्वच स्तरातून पांठिबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
यात नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जवळ आल्याने युवा पिढी हा मोहोत्सव चांगल्याप्रकारे साजरा करण्यासाठी झटत आहेत. त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे.
प्रति वर्षी प्रमाणे याही वर्षी केज तालुक्यातील नाव्होली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले असुन त्यासाठी गावातील तरूणांनी एकत्र येवून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती स्थापन केली आहे.यात या समितीचे अध्यक्ष म्हणून श्री.प्रशांत देशमुख (सर) यांची तर सचिव म्हणून श्री.तानाजी जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर श्री.गोरख मिरगणे (उपाध्यक्ष) , श्री.बाळासाहेब बिक्कड (कोषाध्यक्ष) ,तर सदस्य म्हणून
श्री. रामराजा बिक्कड, श्री.कल्याण बावळे , श्री.अंगद देशमुख , श्री.चंद्रकांत हांडगे , श्री.रामेश्र्वर शिंदे , श्री.बालासाहेब झाडे , श्री.श्रीकृष्ण बिक्कड , श्री. जयराम सिरसट , श्री.पांडुरंग धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे.या समीतीने दिनांक १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या दरम्यान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून १९ फेब्रुवारी रोजी राजांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. हा जयंती मोहोत्सव सुंदर व्हवा भावी पिढीला या महापरूषाचा ईतिहास आठवणीत राहावा.ते संस्कार कोवळ्या मनावर व्हावेत.म्हणून तशा प्रकारच्या प्रभोदनपर कार्यक्रम या मोहोत्सावात आयोजित करण्यात आले आहेत. हा मोहोत्सव आगळावेगळा व्हावा यासाठी सर्व तरूणाई आता कामाला लागली आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button