जालनामराठवाडा

शालेय विद्यार्थ्यांना उशिरा घेऊन आल्याने गोळेगाव च्या ग्रामस्थांनी रोकून धरली परतूर आगाराची बस आगर प्रमुखाच्या लेखी आश्वासनाने ग्रामस्थांनी सोडली बस

आष्टी प्रतिनिधी :- परतूर आगाराची बस क्र. एम.एच.06 एस.8780 गोळेगाव च्या ग्रामस्थांनी रोकून धरल्याचा प्रकार काल दिनांक 8 रोजी घडला अखेर परतूर आगाराच्या आगार प्रमुखाने लेखी आश्वासन दिल्या नंतर बस सोडण्यात आली या विषय अधिक माहिती अशी की गोळेगाव ता.परतूर येथील मुलं व मुली शिक्षणासाठी आष्टीत येत असुन गोळेगाव येथून सकाळी 9 वाजेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना घेऊन येत असते व सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान परत नेऊन सोडण्याचा क्रम असतो मात्र काल 5 वाजले तरी विद्यार्थ्यांना घेऊन बस कशी आली नाही याच्या चिंतेत गोळेगाव चे ग्रामस्थ होते बस काल आनंदगाव 6 चे व गोळेगाव 25 मुलं मुली घेऊन जवळपास दोन तास उशिरा 7:30 वाजेच्या दरम्यान आल्याने संतप्त पालकांनी वाहक चालकांना धारेवर धरत उशिरा आल्याने बस रोकून धरली व बस वेळेवर घेऊन येण्याची मागणी केली या विषयी चालक वाहक व ग्रामस्थांनी घडला प्रकार आगार प्रमुखांना सांगत गाडी वेळेवर सोडण्यासाठी गाडी रोकून धरली या वेळी आगार प्रमुखांनी गोळेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावे लेखी पत्र देत या पुढे गोळेगाव ला सकाळी 9 ते 9:30 वाजता विद्यार्थ्यांना घेऊन येण्यासाठी येईल व परत सोडण्यासाठी सायंकाळी 4:30 ते 5 वाजेच्या दरम्यान वेळेवर सोडण्याची लेखी हमी दिल्या नंतर बस सोडण्यात आली
या प्रकारा विषयी आगारप्रमुख श्री जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की परतूर आगाराच्या मुंबईला साधारण महिना झाला असेल ५ गाड्या गेल्याने व एका गाडी चा अपघात झाल्याने आणि पंढरपूर साठी जादा गाडी सोडल्याने गाड्या कमी व मशीन कमी असल्याने उशीर झाला या पुढे उशीर होणार नसल्याचे या वेळी सांगितले तसे पत्र देखील ग्रामस्थांना दिल्याचे सांगितले

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button