केजबीड जिल्हा

केजमध्ये भरदुपारी घरफोडी : अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून १ लाख १८ हजार रूपयांचे सोन्या चांदीच्या दागिने केले लंपास.

केज,(प्रतिनिधी)

केज येथील केज-कळंब रोड लगतच्या कामगार नगर मधील भरदुपारी अज्ञात चोरट्यानी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटाचे लॉकर तोडून त्यातील साडेचार तोळे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील केज-कळंब रोड लगतच्या कामगार नगर येथे पोपट नवनाथ मुळे यांचे आरसीसी चे घर आहे. दि. १० फेब्रुवारी, बुधवार रोजी सकाळी १०:०० पोपट मुळे हे चिंचोली माळी येथील त्यांच्या दुकानात गेले होते आणि त्यांची पत्नी ही घराला कुलूप लावून साबला येथे माहेरी गेली होती. दुपारी २:०० वा. च्या दरम्यान पोपट मुळे हे केज येथे घरी आले असता त्यांना घराचे दार उघडे असल्याचे आढळून आले. तसेच कुलूप देखील तुटून पडले असल्याचे दिसले.
त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्याचे ३.५ ग्रॅमचे गंठन, प्रत्येकी ३ ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या, १ ग्रॅम वजनाचा एक बदाम व एक अर्ध्या ग्रॅम वजनाची बाळाची अंगठी. असे एकूण साडेचार तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचे चैन व वाळे असा एकूण १ लाख १८ हजार ३०० रु. ऐवजाची चोरी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशानुसार रुक्मिणी पाचपिंडे व बाळासाहेब अहंकारे यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी पोपट मुळे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरुद्ध  गु. र. नं. ६५/२०२१ भा. दं. वि . ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button