केजबीड जिल्हा

वाहतूक नियम पालनातच जीवनाची सुरक्षा – पीएसआय सिध्दे.

सरस्वती महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान

केज ,(प्रतिनिधी)

वाहन परवाना, हेल्मेट, सीट बेल्ट, पी एस यु, आरसी बुुक, विमा आदी नियमाचे पालन करून निष्काळजी पणावर मात केली तर अपघात टाळून स्वतःच्या व दुसऱ्यांच्या जीवाची सुरक्षा करणे शक्य असल्याचे प्रतिपादन पीएसआय दादासाहेब सिध्दे यांनी केले. ते सरस्वती महाविद्यालय केज येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहा निमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी बी पाटील हे होते. यावेळी प्राचार्य विजयकुमार शिनगारे, प्राचार्य हनुमंत सौदागर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य सौदागर म्हणाले, वाहतूक नियमाचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे याचे भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.‌ प्राचार्य शिनगारे यांनी, व्यसन करून वाहन चालवणे अपघात मागील मुख्य कारण असल्याचे सांगितले. तर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ पाटील यांनी, सांकेतिक चिन्ह याची पूर्ण माहिती आणि प्रशिक्षण घेऊनच वाहन चालवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ लक्ष्मण तोंडाकुर प्रास्ताविक डॉ नागेश कराळे तर आभार डॉ जे के जाधव यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button