केजबीड जिल्हा

मेघा कंपनीच्या कामाचा नेमका दर्जा कोणता ?

आठ दिवसापुर्वी केलेल्या सिंमेट रस्त्यावर पाण्याचा थेंब नाही.!

केज, (प्रतिनिधी)

सद्या केज कळंब रस्त्याचे काम मेघा कंपनी करत असून हे काम मुरूम , सिमेंट या स्वरूपात असल्याने यावर पाणी मारणे आवश्यक असताना चिंचोलीफाटा येथे केलेल्या सिमेंट रस्त्यावर आठ दिवसापासून पाणी न मारल्यामुळे हा रस्ता उखडून चालला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की केज शहरात व शहराबाहेर केज कळंब रस्त्याचे काम सद्या सुरु असुन या रस्त्यावर पाणी मारणे आवश्यक असताना केज कळंब रोडवरील चिंचोलीफाटा येथे गेल्या आठ दिवसापूर्वी नांदूर रसत्याचे काम केले आहे. याठिकाणी सिमेंट ची पहिली स्टेप केली असून त्यावर अद्याप पर्यंत त्यावर पाणी मारले नसल्याने यातील सिंमेट राखेप्रमाणे निघुन चालले आहे. या रस्त्यावर कोणाचे लक्ष नाही. मग अशा कामाचा नेका दर्जा कोणता ? हा रस्ता भविष्यात टिकेल काय ? “मेघा कंपनीवर वॉच कोण ठेवतय” ? या रस्त्यावर तात्काळ पाणी मारून रस्ता दर्जेदार करावा अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button