बीड जिल्हा

शेतकऱ्यांना वेठीस  धरणाऱ्या महावितरणच्या विरोधात तिव्र आंदोलन करणार – ता.अ.पोपटराव शेंडगे

वडवणी तालुक्यात महावितरणने शेतीचा विजपुरवठा केला बंद 

वडवणी :- महावितरणने थकित विज बिले वसूल करण्याच्या नावाखाली तालुक्यातील अनेक गावचा शेतीचा विज पुरवठा बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये  उर्जामंत्री व महावितरणच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झालेली आहे. महावितरणने शेतकऱ्यांचा शेतीचा विज पुरवठा सुरळीत सुरू करावा, नसता या अन्यायाच्या विरोधात भाजपच्या वतीने महावितरणच्या विरोधात रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा वडवणी भाजपा तालुका अध्यक्ष पोपटराव शेंडगे यांनी दिला आहे.

गेल्या वर्षी तालुक्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी साठा मुबलक प्रमाणात आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी ऊस,फळबाग यासह इतर पिकांची लाखो रुपये खर्च करून लागवड केलेली आहे, परंतु महावितरणने थकित विज बिल वसुलीच्या नावाखाली अनेक गावचा शेतकऱ्यांचा शेतीला पाणी पुरवठा करणारा विद्युत पुरवठा गेल्या आठ दिवसापासून बंद केला आहे. त्यामुळे शेतातील पिके पाण्या अभावी जळून जात आहेत तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा हि गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.राज्यात कोरोना महामारी मुळे जनता संकटाच्या बाहेर येत असताना राज्य सरकार व महावितरणने शेतकऱ्यांना वेठीस धरणाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये महावितरणच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झालेली आहे.  महावितरणने शेतकऱ्यांचा बंद केलेला विजपुरवठा तात्काळ सुरळीत करावा व विज बिल वसुली मोहीम तात्काळ थांबवावी नसता,उर्जामंत्री व महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाव्दारे भाजपा वडवणी तालुका अध्यक्ष पोपटराव शेंडगे यांनी दिला आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button