बीडबीड जिल्हा

पत्रकारांना कोरोनाची लस प्राधान्याने द्यावी बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाची मागणी

बीड /प्रतिनिधी
कोविड 19 च्या लढाईत आरोग्य, पोलीस, शिक्षक आणि महसूल कर्मचाऱ्यां बरोबरच पत्रकारांनी देखील आपल्या जीवाची पर्वा न करता वृत्तांकन करत प्रशासनाला मदत केली. यामध्ये काही पत्रकारांना कोविड19 ची बाधा झाली होती. काही दिवंगत झालेले आहेत. त्यामुळे जिलह्यातील पत्रकारांना कोव्हिड 19 ची लस देण्यात यावी अशी मागणी बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
आता जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम सुरू असून आरोग्य, पोलीस, शिक्षक, महसूल कर्मचाऱ्यांबरोबरच पत्रकारांनाही प्राधान्याने लस देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा माहिती अधिकारी किरण वाघ याना मराठी पत्रकार परिषद मुबंई संलग्न बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने देणयात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, सचिव विलास डोळसे, संदीप बेदरे, विशाल साळुंके, लक्ष्मण गायकवाड, कृष्णा शिंदे आदी उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button