जालना

वाढदिवसाचा खर्च टाळून मराठा क्रांतीभवनला दिली देणगी

आष्टी(प्रतिनिधी) सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे व समाजाप्रती तळमळ असणारे गोळेगावचे माजी सरपंच दादाभाऊ तौर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने परतूर येथील मराठा क्रांती भवन उभारणी साठी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये देणगी नुकतीच प्रदान केली असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे,

आजकाल वाढदिवस व वाढदिवसा वर वेगवेगळ्या प्रकारची जाहिरात बाजी बडेजाव करण्याचा पायंडा सुरु आहे मात्र या सगळ्या गोष्टींना बगल देऊन एक विधायक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधीलकी जपत वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून देणगी स्वरूपात एक स्तुत्य कार्य केले आहे त्याबद्दल त्यांचे क्रांती भवन समिती कडून आभार मानले जात आहेत,धनादेश प्रदान करतेवेळी माऊली सोळंके, उद्धव डोळस,राजेश नायक, महेश सोळंके, मधुकर कोल्हे शांतिलिंग शेटे,गणेश चिंचोलकर आदी उपस्थित होते

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button