बीडबीड जिल्हा

बंडू खांडेकर यांची भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या मराठवाडा संयोजकपदी निवड

बीड  :- भारतीय जनता पक्षाने निष्ठावंत कार्यकर्ते बंडू खांडेकर यांची पक्षाच्या भटके विमुक्त प्रकोष्ठाच्या विभागीय संयोजक (अध्यक्ष) पदी निवड करण्यात आली आहे. मुंबई येथील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशसंयोजक नरेंद्र पवार यांनी त्याची निवड घोषित केली. खांडेकर यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

बीड जिल्ह्यातील भाजपचे क्रियाशील कार्यकर्ते बंडू खांडेकर यांचे भटक्या विमुक्त जाती जमाती मधील संघटन, संपर्क व काम करण्याची हातोटी पाहून त्यांच्यावर मराठवाडा विभागाची जवाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचे संघटन मंत्री विजय पुराणिक, प्रकोष्ठाचे प्रभारी श्रीकांत भारतीय, खा.पद्मश्री डॉ.विकास महात्मे, प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार, प्रदेश सहसंयोजक अशोक चोरमले, महिला आघाडीच्या संयोजक डॉ.उज्वलाताई हाके, सहसंयोजक धरमसिंग राठोड, सहसंयोजक संतोष आव्हाड, युवा संयोजक अमोल गायकवाड, युवती संयोजिका ऍड.भाग्यश्री ढाकणे, डॉ.उज्वलाताई दहिफळे, आदी भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश पदाधिकारणी सदस्यांच्या उपस्थितीत खांडेकर यांच्यावर उपरोक्त जवाबदारी सोपविण्यात आली.
समाजातील भटका समाज हा निरंतर भटकंती करत असतो, भाकरीचा चंद्र शोधण्यात जीवन कंठीत असलेला समाज मूलभूत गरजा व हक्कांपासून अद्याप वंचित आहे. या छोट्या छोट्या समाज घटकांना संघटित करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजपाने हा प्रकोष्ठ गठीत केला असल्याचे संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी सांगितले. तसेच पदाधिकाऱ्यांनी नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये जाऊन काम केले पाहिजे अशी सूचनाही त्यांनी केली.
लोकनेते स्व.मुंडे साहेब व भाजपची विचारधारा जनसामान्यांमध्ये रुजविण्यासोबतच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोकांच्या उन्नतीसाठी निष्ठेने काम करण्याची ग्वाही बंडू खांडेकर यांनी यावेळी दिली. त्यांच्या निवडीबद्दल मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, डॉ.लक्ष्मण जाधव, माजी आ.आर.टी. देशमुख, आंबा साखर चे चेअरमन रमेशराव आडसकर, छत्रपती साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहनराव जगताप, भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत, भगवानराव सरवदे आदींनी स्वागत केले असून संघटन बांधणीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button