केजबीड जिल्हा

मेघा कंपनीच्या पर्यायी रस्त्यावर लागलाय झरा. कोण म्हणयं खोटा;तर कोण म्हणतोय खरा.

वाहनचालकांची तारेवरची कसरत; केज कळंब रस्त्यावर दोन दोन किलोमीटर वाहाणांच्या रांगा.

महादेव काळे,केज

सध्या केज शहरात व शहराबाहेर बिड केज व केज कळंब रस्त्याचे काम सुरु असून या कंपन्या अगदी बेपर्वाईने काम करत असुन त्यात सुरळीत वाहतूकीचे तिन तेरा वाजले आहेत. यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
तर केज कळंब रस्ता करणाऱ्या मेघा कंपनीने तर कहरच केला असुन पर्यायी रस्त्यावर पाणीचपाणी झाल्याने वाहनचालकांची ऐशी तैशी झाली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की केज कळंब रस्त्याचे काम मेघा कंपनीच्या मार्फत केज शहरात व शहरालगत सुरु आहे. परंतु या कंपनीने कोणत्याही प्रकारची वाहतूक व्यवस्था केली नसल्याने व पर्यायी रस्ता हा धोकादायक बनल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. केज कळंब रस्त्यावर कृषी ऊत्तपन्न बाजार समीती जवळच्या पुलाचे काम सुरू असुन त्यामुळे मेघा कंपनीने मोंढ्यातुन पर्यायी रस्त्याची व
व्यवस्था केली आहे. मात्र या ठिकाणी एक मोठी नाली असुन या ठिकाणाहून ये जा करणारी वाहनांच्या वर्दळीने नालीवरील स्लँब तुटला असुन नालीचे पुर्ण पाणी रस्त्यावरून वाहून पुढील पुलावर साठल्याने व त्या ठिकाणी डोह तयार झाले आहेत. त्यामुळे वाहानांना या पाण्यातून व खड्यातुनच मार्गक्रमण करावे लागत आहे. तर बाजार समितीच्या कमानीच्या वळणावर नाली फुटून त्या ठिकाणाहुन चोवीस तास पाणीच पाणी वाहत असल्याने जणू याठिकाणी पाण्याचा झरा लागला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर ऊसाचा हंगाम सुरू असल्याने या रस्त्यावरून ऊसाच्या ट्रक , अवजड वाहने येत जात असल्याने या नदीवरील जुना पुल देखील आता खचत असुन या ठिकाणी मोठा धोका निर्माण झाला आहे. तर अनेक दुचाकी स्वार याठिकाणी चिखलामुळे घसरून पडत आहेत. बुधवार रोजी दुपारी तर कहर झाला. कळंब चौकापासून ते अनिकेत ऑईल एजन्सीच्या पलीकडे तिहेरी दोन तास वाहाणांच्या रांगा लागल्या होत्या. तरी मेघा कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याचे काही ऐक देणे घेणे नसल्याचे दिसून आले. तर वाहतूक पोलिस दोनजणांच्या व्यतिरिक्त कोणी ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणी दिसून आले नव्हते. मग दोन तास व दोन किलोमीटर च्या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण ?
वाहतूक पोलीस कि या रस्त्याचे काम करणारी मेघा कंपनी.? भले कोणी का असेना परंतु या निरपराध जनतेला आज घडीला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याचे काम करणारी मेघा कंपनी जनतेच्या जिविताशी किती खेळ खेळत आहे. हे कालच्या वाहतूक कोंडीवरून लक्षात येते. या कंपनीवर कोणाचेही नियंत्रण नाही. यांना जाब कोणी विचारणारे नाहीत कि काय? हि मेघा कंपनी एवढ्या बेपर्वाईने कशी वागत आहे.हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

 

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button