जालनामराठवाडा

आष्टी येथील प्रशासनाच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांना हाकलून लावते…लग्नसमारंभ मात्र जोमात

आष्टी / प्रतिनिधी
परतूर तालुक्यातील आष्टी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठरवलेल्या नियमाचे पालन होताने दिसून येत नाही.गेल्या काही दिवसात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे म्हणून जिल्हाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत.त्या अनुषंगाने दि 26 रोजी आष्टी येथे भरणाऱ्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांना हुसकावून लावले, तर काही शेतकऱ्यांना मारहाण केल्याची ही चर्चा आहे.यावेळी आम्हाला वेळेवर माहिती न देता आदल्या दिवशी उशिरा दवंडी दिल्याचे शेतकऱ्याकडून सांगितले.या बाजारात आष्टीच्या आजूबाजूला येणाऱ्या चाळीस खेड्यातील शेतकरी येतात त्यांना ही दिलेली दवंडी माहिती नव्हती आज आम्ही भाजीपाला घेऊन आलोत एवढा विकू द्या पुढच्या वेळी आम्ही येणार नाही म्हणत शेतकऱ्यांनी स्थानीक ग्रामपंचायत व पोलिसांना साद घातली पण त्याचं काहीही न ऐकता त्यांना हाकलून लावले.याचाच रोष म्हणून शेतकरी यांनी स्थानीक प्रशासनाच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.भाजीपाल्याचा बाजार भरला तर कोरोनाचा प्रसार होतो तर याच आष्टी शहरात असलेल्या मंगलकार्यालयात शेकडो लोक एकाजागी जमवून जोमात लग्न लावल्या जातात त्या वेळी येथील स्थानिक प्रशासन गप्प बसत बघ्याची भूमिका का घेत आहे.अशा संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या शेतकऱ्याचा वाली कोण कोरोनाच्या नियमात फक्त शेतकरीच भरडल्या जातोय यावर लक्ष वेधण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button