जालना

त्या पिडीतेची व समाजाची बदनामी थांबवा – बंजारा समाजाची मागणी

आष्टी :- गेल्या काही दिवसा पासुन पीडित युवतीचे चारित्र्य हनन करून बंजारा समाजाची नाहक बदनामी करण्यात येत असुन हि बंद करण्याची मागणी बाबत चे निवेदन येथील बंजारा समाजाच्या वतीने आष्टी पोलीस ठाण्यास देण्यात आले आहे. यात असे म्हंटले आहे की पिडीत युवती हिचे अशोभनीय वेगवेगळ्या प्रकारचे फोटो , ॲडीओ क्लिप, सध्या प्रसार माध्यमातून प्रसारित करून वाट्टेल तशी बदनामी करून तिचे नाव व जातीचा उल्लेख वारंवार करून पिडीताची व समाजाची बदनामी करत आहेत. तसेच चित्रा वाघ, देवेंद्र फडवनीस ,अतुल भातळकर,चंद्रकांत पाटील,प्रवीण दरेकर इतर भाजप च्या नेत्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रसार माध्यमामध्ये सदर पिडीत युवती बाबत सार्वजनिक रित्या गर्भवती होती,तिचा गर्भपात करण्यात आला आहे असे विविध प्रकारचे चारित्र्य हनन करणारी माहिती प्रसारित केल्याबाबत सदर पिडीताची आई-वडील व नातेवाईकाना समाजामध्ये कोठेही तोंड दाखविण्याचे लायकीचे ठेवले नाहीत वास्तविक पाहता कायद्यानुसार पिडीताची बदनामी करणे कायद्याने गुन्हा आहे तरीही चित्रा वाघ यांनी विविध पत्रकार परिषद घेऊन पिडीताचे तसेच समाजाचे वारंवार नाव घेऊन बदनामी केली आहे. या प्रकरणाची चौकशी पोलीस करीत आहे ती चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर भाजप नेत्यानी कोणत्याही प्रकारची पिडीताची व समाजाची बदनामी करू नये अशी समस्त बंजारा समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे या निवेदनावर श्याम आढे, विकास राठोड, महेश आढे,बालाजी आढे,सुधाकर जाधव ,प्रधान राठोड, गोरख चव्हाण , देवराव राठोड,संजय चव्हाण, मिथुन चव्हाण यांची नावे आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button