केजबीड जिल्हा

येणाऱ्या महाशिवरात्रीवर कोरोनाचे भयान संकट.! हानुमंत पिंप्रीची यात्रा केली रद्द ;

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतने घेतला निर्णय.

महादेव काळे,केज

जिल्ह्यात कोरोना रूग्नाची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच चालल्याने गतवर्षीच्या प्रमाणे यावर्षीही प्रशासनावर जनतेच्या सुरक्षेचा ताण येवु नये म्हणून वेळीच सावध पवीत्रा घेत मा.जिल्हाधिकारी साहेब बीड यांनी कठोर निर्णय घेत आठवडी बाजार , यात्रा तात्काळ बंद करण्यात याव्यात असे कडक निर्देश दिल्याने हनुमंत पिंप्री येथे दर वर्षी भरणारी महाशिवरात्रीची यात्रा रद्द करण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्यातील कोरोना आजाराच्या रूग्नांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मा.जिल्हाधिकारी साहेब बीड यांनी काल रात्री उशिरा सर्व प्रशासनाला दक्षतेचा ईशारा देत तात्काळ अनेक कडक निर्बंध लागु केले असुन या मध्ये संम्मेलने , अंदोलने , आठवडी बाजार , यात्रा यांचेवर ३१ मार्च २०२१ पर्यंत बंदी घालण्यात आल्याने यामुळे आरोग्य विभागासह सर्व यंत्रणा सतर्क झाली आहे. यामुळे केज तालुक्यातील हनुमंत पिंप्री येथे दर वर्षी महाशिवरात्रीच्या निम्मिताने मोठी यात्रा भरवली जाते. परंतु यावर्षीच्या कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री निमित्त भरणारी यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली असुन त्याबाबतचे हानुमंत पिंप्री येथील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयाने पत्रक काढले असुन मा.जिल्हाधिकारी साहेब बीड यांच्या आदेशानुसार या वर्षी यात्रा रद्द केल्याने व्यापारी, भाविक ,व यात्रेकरू यांनी कृपया या वर्षी हानुमंत पिंप्री येथे येवु नये असे गावच्या सरपंच सौ.मनिषा जालिंदर चंदनशिव व ग्रामसेवक श्री.वटाणे यांनी केज तहसीलदार यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मा.जिल्हाधिकारी साहेब बीड यांचे सदरिल आदेश हे ३१ मार्च २०२१पर्यंत लागु राहाणार आहेत. त्यामुळे जनतेने आपल्या स्वहितासाठी घराबाहेर पडणे टाळावे. व आदेशाचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button