बीड जिल्हा

कोरोना लसीकरण संपूर्णपणे सुरक्षित असून लसीकरण करून घ्यावे-जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

बीड, ::-कोरोना च्या संसर्गजन्य आजार वरील लसीकरण संपूर्णपणे सुरक्षित असून या लसीबाबत गैरसमज न बाळगता सर्वांनी वेळेत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले.

जिल्हाधिकारी श्री जगताप यांनी जिल्हा रुग्णालयास भेट दिली. त्यांनी आज कोरोना प्रतिबंधक लस घेतली .यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयात अंतर्गत कोरोना उपचार केंद्र साठी उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटची तसेच येथील लसीकरण केंद्र, नोंदणी कक्ष आदींची पाहाणी केली. याप्रसंगी ते म्हणाले, कोरोना हा संसर्ग पूर्णपणे गेलेला नाही यासाठी देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन केल्यास आपण यातून बाहेर पडू शकतो आपण निम्मी लढाई जिंकली आहे. अशा परिस्थितीमध्ये लसीकरण साठी पुढे येऊन आपण दिलेल्या वेळेत लसीकरण करून घेतले पाहिजे असे जिल्हाधिकारी श्री जगताप यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी covid-19 लसीकरण केंद्र आणि जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी -कर्मचारी आदींशी संवाद साधला त्यांच्यासमवेत याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक

डॉ. सूर्यकांत गीते व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड हे उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button