बीडबीड जिल्हा

अर्थसंकल्प सर्वोत्तम आणि सामान्य जनतेसह शेतकऱ्यांना दिलासा देणारा—अमरसिंह पंडित

बीड :-सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प सर्वोत्तम आणि आदर्श असून संपुर्ण राज्यासह बीड जिल्हाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात चांगले निर्णय झाले आहेत. ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना
० % व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या घोषणेसह अर्थसंकल्पातून बीड जिल्ह्यातील तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधीचा वर्षाव केला असून अर्थमंत्री ना. अजितदादा पवार आणि जिल्हाचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठा हातभार लावला असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की, राज्याचा अर्थसंकल्पात अतिशय चांगले आणि स्वागतार्ह निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्यात पहिल्या स्वतंत्र महिला राज्य राखीव दलाची घोषणा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मोफत एसटी प्रवास करण्याची योजना,
महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामीनी योजना, ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ०% व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना आणि स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला निधी देण्यासाठी साखर कारखान्यांकडून ऊस गळापानुसार प्रतिटन १० रुपये आकारून तेवढाच निधी देण्याची घोषणा या शेतकरी, महिला, विद्यार्थिनी आणि सामान्य जनतेला दिलासा देणा-या आहेत.

बीड जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात भरभरून तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधीचा वर्षाव करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास, माजलगाव येथील भगवान पुरुषोत्तम यांच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार व परिसराचा विकास, यासह जिल्ह्यातील नारायणगड, गहिनीनाथगड तसेच जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या भगवानगड या तीर्थ क्षेत्रांच्या विकासासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नारायणगड, भगवानगड, गहिनीनाथगड आदी तिर्थक्षेत्रांचा दौरा करून त्याठिकाणी भरीव विकासनिधीच्या मार्फत विकासकामे हाती घेण्याचा शब्द दिला होता. तो शब्द खरा करण्यात आणि तीर्थस्थळे विकसित करण्यासाठी निधी खेचून आणण्यात ना. मुंडें. यांना यश आले असल्याचे सांगून माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांचे आभार प्रसिद्धी पत्रकात शेवटी मानले आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button