बीडबीड जिल्हा

लग्नसराईत ‘प्रिंटिंग प्रेस’ची चाके थांबली

जिल्ह्यात संघटन होण्याची गरज

बीड शहरासह जिल्ह्यात अंदाजे जवळपास दीडशे ते दोनशे प्रिंटिंग प्रेस आहेत, हा व्यवसाय उभारण्यासाठी लाखोचे कर्ज घेऊन प्रिंटिंगच्या व्यवसायात उतरलेल्या तरुणावर लॉकडाऊन ने पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. प्रिंटिंग प्रेस ची चाके थांबल्याने मुद्रक अडचणीत आले आहेत. त्यासोबतच त्यांच्यावर अवलंबून असणारे कारागीर ऑपरेटर मजूर व कामगारांचाही रोजगार हिरावला आहे. त्यातच हातावर पोट असण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. यातच प्रिंटिंग प्रेस व्यवसायिकांच्या मशीनची चाके थांबल्याने मुद्रण व्यावसायिक अडचणीत आले आहे. ऑफसेट प्रिंटिंग, बाइडींग, स्क्रीन प्रिंटिंग, कटिंग च्या मशनरी वर काम करणाऱ्या हातांना व या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या करागिरांसह इतर कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचणीत आहेत. गंभीर परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, घर भाडे, दुकान भाडे, कसे भरायचे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. वर्षभरात जानेवारी ते जूनपर्यंत लहान-मोठे विवाह मुहूर्त असतात, त्याचबरोबर लहान-मोठे कार्यक्रम, उद्घाटन सोहळे, माहितीपत्रके, शैक्षणिक छपाईची कामे असतात. मार्च ते मे या तीन महिन्यात लग्नसराई मोठ्या प्रमाणात असल्याने सुमारे एक,दोन महिन्या अगोदर विवाह पत्रिका छापली जाते, मात्र गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून लॉक डाऊन मुळे व्यवसायिक व कारागीर पूर्णपणे हतबल झाले आहे. मात्र बीड जिल्ह्यामध्ये हा व्यवसाय करणार याची ना कुठे नोंद आहे ना कुठे संघटना.
===============================
हाय व्यवसाय संकटात येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कोरोणा सारख्या महामारी मध्ये
कुठलेही मोठे कार्य झाले नाही, त्या कार्यासाठी निमंत्रण पत्रिका ची आवश्यकता असते मात्र निमंत्रण पत्रिका छापली गेली नाही आणि दुसरी गोष्ट अशी की, काही प्रमाणात छोटे-मोठे कार्यक्रम झाले त्यामध्ये भर पडली सोशल मीडियाची या सोशल मीडियामुळे अक्षरशा दुकान बंद करण्याची वेळ आली
-सचिन इगडे(सचिन ऑफसेट)

=================================
या व्यवसायामध्ये मी जवळपास वीस ते तीस वर्षे झाली काम करत आलो आहे. मात्र आतापर्यंत असे कुठलेही संकट आले नव्हते अशी असताना आमचा प्रिंटिंग व्यवसाय गेल्यावर्षीच्या लॉकडाउन चालू झाल्यापासून जास्तच संकटात आला आहे.
– के. पाटेकर (संगम ऑफसेट)

===============================

गेल्या वर्षीच्या मार्च च्या लॉक डाऊन नंतर कसल्याच प्रकारचे प्रिंटिंग व्यवसायासाठी छोटे-मोठे काम चालू झाले नाही. मध्यंतरीच्या काळात डिसेंबर-जानेवारीमध्ये थोड्या प्रमाणात कॅलेंडर चे काम झाले त्यानंतर पूर्णतः कामबंद आहे.
-संतोष ठोसर(शिवमुद्रा ऑफसेट)

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button