गेवराईबीड जिल्हा

ग्रामीण भागातील विकास कामांच्या दर्जाबाबत तडजोड करणार नाही -अमरसिंह पंडित

अमरसिंह पंडित यांच्या हस्ते कांबी येथे रस्ता कामांचा शुभारंभ

गेवराई :-ग्रामीण भागातील विकास कामांसाठी आपण सतत प्रयत्न करत असून कामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही. रस्ता, पाणी आणि आरोग्य आदी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असून ग्रामस्थांनी आपल्या भागाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. गेवराई विधानसभा मतदार संघातील मौजे कांबी (पेंडगाव) येथे कांबी ते कदम वस्ती या सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

गेवराई विधानसभा मतदार संघातील मौजे कांबी (पेंडगाव) येथे मंगळवार दिनांक ९ मार्च रोजी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये कांबी ते कदम वस्ती या सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोरोनाच्या संदर्भातील सर्व अटी, नियम व सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले.

यावेळी कांबी ग्राम पंचायतचे सरपंच वसुदेव पिसाळ, उपसरपंच जगन्नाथ भडके, पांडुरंग रहाडे, महादेव रहाडे, लक्ष्मण घोरपडे, कैलास कदम, संतोष घोरपडे, रामेश्वर भडके, गुणाजी शिंदे, गोरख भडके, रामेश्वर रहाडे, आनेराव लहू, आनेराव अंकुश यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button