बीडबीड जिल्हा

नागरिकांनो, कोरणा बाबतच्या नियमाचे पालन करा, मास्क वापरा – अन्यथा करा कारवाया – अँड. अजित देशमुख

बीड  :- बीड जिल्ह्यात कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात काही आदेश जारी केले असून या आदेशाची अंमलबजावणी बऱ्याच ठिकाणी होतांना दिसत नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी देखील रस्त्यावर येऊन या आदेशाची अंमलबजावणी होते का ? हे काही ठिकाणी तपासने गरजेचे झाले असल्याचे मत जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे आदेश जारी केले जातात. मग हे आदेश कधी राज्य सरकारी करते, तर कधी जिल्हा प्रशासन जारी करते. मात्र केवळ आदेश देऊन कधी-कधी त्याची अंमलबजावणी बरेच ठिकाणी होत नसताना दिसते.

कोरोना बाबतच्या या आदेशांची देखील परिस्थिती अशीच झाली असून रस्त्याने फिरताना किंवा वेगवेगळ्या कार्यालय परिसरांमध्ये मास्क न वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. ही बाब स्वतःबरोबर अन्य लोकांनाही घातक असल्याचे जनतेला दिसत असले तरी देखील याबाबत गांभीर्य बाळगले जात नाही.

जमावबंदी आदेश लागू आहे. विवाह अथवा अन्य मोठे समारंभ टाळण्याचे आदेश आहेत. बाजार भरऊ नका, कोचिंग क्लासेस भरवू नका, त्याचप्रमाणे यात्रा भरऊ नका, असेही आदेश आहेत. यात अनेक आदेशांची सध्या पायमल्ली होताना दिसत आहे.

वाढत असलेल्या कोरोणा रुग्णांची संख्या पाहता जनतेने जास्तीत जास्त प्रमाणात दक्ष राहणे आवश्यक आहे. जनतेने शिस्त पाळली नाही तर प्रशासनाला आणखी बडगा उगारावा लागेल. आणि त्यातून जनतेला आपलेच नुकसान झाल्याची दिसून येईल. त्यामुळे जनतेने शिस्त पाळावी आणि जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे ही देशमुख यांनी म्हटले आहे.

वेगवेगळ्या कार्यालय परिसरांमध्ये त्या-त्या कार्यालय प्रमुखांनी मास्क बाबत दक्षता पाळणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे आपल्या कार्यालयामध्ये गर्दी होत असेल तर ती शिस्तीत व्हावी, यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वच कार्यालयांनी याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.

नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये मुख्य अधिकाऱ्यांचे अजिबात लक्ष नाही. संपूर्ण जिल्ह्यात हीच परिस्थिती असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या मुख्याधिकार्‍यांनी याबाबत तात्काळ लक्ष घालावे आणि कारवायांना प्रारंभ करावा, असेही अँड. देशमुख यांनी म्हटले आहे.

पॉझिटीव्ह आलेल्या लोकांचे काय हाल असतात, त्याचे कुटुंब किती भयभीत होते, हे आम्ही जवळून पाहिले आहे. सर्वांचाच विमाही उतरवलेला नसतो. त्यामुळे लाखावर खर्च परवडणारा नसतो. म्हणून काळजी घेण्याची आवाहन देखील अँड. देशमुख यांनी केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button