बीड जिल्हा

राज्य माहीती आयोगाचा दणका;निलेश चाळक यांच्या प्रकरणात जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बीड यांना पाच हजार रुपये दंड

बीड- बीड जिल्ह्यातील नर्सरी के जी 1 के जी 2 या वर्ग विषयी माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कार्यालय बीड यांच्या कडे मागितली होती जनमाहीती अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय बीड यांनी माहीती नाही दिल्या मुळे राज्य माहीती आयुक्त खंडपिठ औरंगाबाद यांनी माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांच्या प्रकरणात जनमाहीती शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कार्यालय बीड यांना पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे राज्य माहीती आयोगाच्या या दणक्यामुळे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कार्यालय बीड खडबडून जागे झाले आहे

याबाबत अधिक माहिती अशी कि, बीड येथील माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग जिल्हा परिषद कार्यालय बीड यांच्याकडे दि 03/02/2019 रोजी माहीती अधिकार अर्ज दाखल करुन बीड जिल्ह्यातील किती नर्सरी के जी 1 के जी 2 या वर्ग / शाळा याबाबत सविस्तर माहिती माहीती अधिकारात मागवली होती.जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कार्यालय बीड यांनी माहिती न दिल्याने राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांनी जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कार्यालय बीड यांना पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणात अपिलार्थी निलेश चाळक यांचा माहीती अधिकार अर्ज दि. 03/02/2019 रोजी चा असुन या अर्जासंदर्भात अधिनियमातील तरतुदीनुसार सुसंगत प्रतिसाद देवुन माहीती अथवा माहीती संदर्भातील वस्तुस्थिती न करुन देण्यास जबाबदार जबाबदार जनमाहीती अधिकारी यांची नावे निश्चित करुन त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करुन ती लेखाशिर्षामध्ये जमा करण्याची जबाबदारी कलम 19(8)क व 19(7) अन्वये राज्य माहीती आयोग खंडपिठ औरंगाबाद यांच्या तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय बीड यांच्या वर निश्चित करण्यात आली आहे ही दंडाची रक्कम वसुल करुन लेखाशिर्षा मध्ये जमा करण्याचे दि.31/12/2020 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना आदेश देण्यात आले आहेत.त्याच बरोबर शास्तीची पाच हजार रुपयांची वसुली झाल्यानंतर त्या संदर्भातील अहवाल राज्य माहिती आयोगाकडे सादर करण्यात यावा असे ही राज्य माहीती आयुक्त औरंगाबाद यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय बीड यांना आदेशित केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button