गेवराईबीड जिल्हा

ग्रामीण भागाच्या विकासकामात कधीही खंड पडू देणार नाही—विजयसिंह पंडित

नांदलगाव, मालेगाव मंजरा, सिंदफणा चिंचोलीत विविध विकसकामांचा भव्य शुभारंभ

गेवराई :-विकासकामात यापुर्वी कधीही राजकारण केले नाही आणि यापुढेही केले जाणार नाही. ग्रामीण भागाचा विकास हाच ध्यास मनी घेऊन आमची वाटचाल चालू आहे, त्यामध्ये कधीही आणि कसलीही परिस्थिती आली तरी खंड पडणार नाही असे प्रतिपादन माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे नांदलगाव, मालेगाव मंजरा, सिंदफणा चिंचोली येथे विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ करताना ते बोलत होते.

माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामांनी गती घेतली असून माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते आज बुधवा दिनांक १० मार्च रोजी गेवराई विधानसभा मतदार संघातील मौजे नांदलगाव, मालेगाव मंजरा, सिंदफणा चिंचोली क्र.०२ येथे सार्वजनिक पाणी पुरवठा विहीर, तांडा वस्ती येथे अंगणवाडी बांधकाम, नांदलगाव येथे विशेष घटक योजने अंतर्गत पाणी पुरवठा विहीर,
जि. प.शाळा खोली भूमिपूजन, रस्ता कामासह आदी विकासकामांचा भव्य शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बाजार समितीचे उप सभापती शाम मुळे, माऊली आबुज, शेख मुसा, रमेश वाघमारे, मेघराज कादे, रवी शिर्के, दत्ता घवाडे, शेख तैमूर, सरपंच सुनील राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम घेण्यात आला.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button