केजबीड जिल्हा

केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंप्री आणि तांबवा येथील तांबवेश्वर मंदिर महाशिवरात्री दिवशी बंदच. !

तहसीलदारांनी भेट देऊन केली पहाणी; व्यवसाईक , व्यापारी, भाविक यांना मास्क घालण्याचे केले आवाहन.

केज :-केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंप्री आणि तांबवा येथील तांबवेश्वराचे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने प्रतिवर्षा प्रमाणे भरणारी भव्य यात्रा भरली नाही.

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णामुळे जिल्हा प्रशासनाने संसर्ग टाळण्यासाठी कोव्हिड प्रतिबंध आदेशानुसार सर्व आठवडी बाजार, यात्रा आणि शाळा या बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे दि.१० मार्च रोजी महाशिवरात्री च्या मुहूर्तावर उत्तरेश्वर पिंप्री येथे भरणारी उत्तरेश्वर यात्रा व तांबवा येथील तांबवेश्वर देवस्थानची यात्रा भरली नाही. केज तालुक्यातील दोन्ही मंदिरे प्रशासनाने बंद ठेवली आहेत. तसेच पुजाऱ्यांना व मंदिर समिती आणि ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत.

दरम्यान तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी काल हानुमंत पिंप्री येथील मंदिर परिसरात भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली.या वेळी त्यांच्या समवेत असलेले नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे हॉटेल चालक , यांना आपापले व्यवसाय बंद ठेवण्यास सांगत भाविकांनी व व्यावसायिक, व्यापारी या सर्वांनी मास्क लावणे बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

मंदिर परिसरात दिनकर पुरी, अमोल गायकवाड, धनपाल लोखंडे, हनुमंत चादर, अशोक गवळी, दिलीप गित्ते, बाळासाहेब अहंकारे, भास्कर सिरसट, जिवन करवंदे, सिद्धेश्वर डोईफोडे, आघाव, शिंदे तसेच गृह रक्षक दलाच्या महिला कर्मचारी बंदोबस्तावर आहेत.

आम्ही गेल्या आठ दिवसापासून मंदिर कमेटी , यात्रा कमेटी , ग्रामस्थ व ग्रामपंचायतने बैठक घेऊन शासनाच्या आदेशानुसार यात्रा रद्द करून मंदिर बंद ठेवले असुन शासनाच्या नियमाचे आम्ही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेत आहोत.

श्री जालिंदर चंदनशिव हानुमंत पिंप्री ता.केज जि.बिड.
सरपंच प्रतिनिधी.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button