गेवराईबीड जिल्हा

शासन परिपत्रक रद्द करुन बंद केलेल्या दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांची नावे आयुक्तालय स्तरावर ठेवण्यात आलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करा नसता धरणे आंदोलन

शिक्षक भारती विशेष शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

गेवराई: शासनाने निर्गमित केलेले दि.२४/१०/ २०१७ चे शासन परिपत्रक रद्द करुन बंद केलेल्या दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांची नावे आयुक्तालय स्तरावर असलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या यादीत दि.२० मार्च २०२१ पर्यंत समाविष्ट करा नसता दि.२२ मार्च २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोवीड- १९ च्या नियमांचे पालन करुन तिव्र धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिक्षक भारती विशेष शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
खंडपिठ औरंगाबाद रिट याचिका क्र .19804 / 2017 नुसार बंद पडलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांची नावे आयुक्तालय स्तरावर ठेवण्यात आलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या यादित समाविष्ट करणे बाबतचे आदेश आहेत . परंतु शाळा बंद केल्यानंतर सदरील संस्थेने पुन्हा संधी मिळणे बाबत शासनाकडे अपिल केलेले असलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांचे आयुक्तालय स्तरावर ठेवण्यात आलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या यादित नाव समाविष्ट करण्यात येऊ नये असे शासनाचे दि .24 / 10 / 2017 चे शासन परिपत्रक आहे . सदरील दि .24 / 10 / 2017 चे शासन परिपत्रक रद्द करुन आयुक्तालय स्तरावरुन बंद करण्यात आलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांची नावे आयुक्तालय स्तरावर ठेवण्यात आलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या यादित समाविष्ट करणे बाबत मा.आयुक्त , लोकप्रतिनिधी , संघटनांनी निवेदन व पत्राद्वारे विनंती केली आहे . सदर दि .24.10.2017 चे परिपत्रक रद्द करणे बाबत मंत्रालय स्तरावर कार्यवाही सुरु असून त्या फाईलचा क्रमांक 491 फाईल क्र .505534 असा आहे. तरी मा.मंत्री महोदय विनंती की , सदरील दिव्यांग शाळा बंद होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला असून सदरील बंद केलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी, दि .24.10.2017 चे शासन परिपत्रक रद्द करुन राज्यातील बंद केलेल्या दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांचा समायोजनाचा मार्ग 20.03.2021 पर्यंत मोकळा करावा नसता दि .24.10.2017 चे शासन परिपत्रक रद्द करुन बंद पडलेल्या दिव्यांगाच्या शाळेतील कर्मचाऱ्याचे समायोजन करणे बाबतचे शुध्दीपत्रक वरील दिनांकापर्यंत निर्गमित न केल्यास दि .२२ मार्च २०२१ पासुन विशेष शाळा कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना बीड व बीड जिल्ह्यातील बंद पडलेल्या दिव्यांगाच्या शाळेतील सर्व कर्मचारी यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर तिव्र आंदोलन करण्यात येईल . तसेच आंदोलन काळात काही अनुचित प्रकार घडल्यास किंवा आंदोलनकर्त्यांच्या जिवीतास काही धोका निर्माण झाल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी असे जिल्हाधीकारी बीड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ‌.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button