केजबीड जिल्हा

मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश धाब्यावर बसवून केजमध्ये भरतोय भरगच्च बाजार.!

कुठे आहे नगरपंचायत; बाजारकरु व व्यापारी विनामास्कचेच, प्रशासनापुढे कोरोनाला रोखण्याचे तगडा आव्हान.!

महादेव काळे ,केज

जिल्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असताना आणि केज तालुक्यातील कोरोना रूग्न संख्येत वाढ होत असतानाही जनता कोरोना आजाराला फारसे गांभीर्याने घेताना दिसत नसल्याचे पहावयास मिळत आहे.
तर प्रशासकीय यंत्रना तोकडी पडत असल्याचेही चित्र सध्या केज शहरात पहावयास मिळत आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की जिल्हयात कोरोना आजाराचे रूग्न संख्या दिवसेंदिवस वाढत असून हा आकडा कमी जास्त दोनशेच्या आसपास पोहचला आहे. तर केज तालुक्यातही या आजाराची रूग्न संख्या वाढत आहे. एकीकडे प्रशासन कोरोना आजाराबाबत जनतेला काळजी घेण्यसाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. पंरतु त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये केजचे तहसीलदार त्यांची टिम घेवून स्वतः रस्त्यावर उतरून जनतेला सावधान करत आहेत. ध्वनीक्षेपकाद्वारे जनतेला मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे सांगुनही शहरातील जनता विनामास्क बिनधास्तपणे शहरात फिरताना दिसत आहेत. कोरोना आजाराला पायबंद घालण्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांनी यात्रा ,आठवडी बाजार , संम्मेलने , मेळावे , मोर्चे , अंदोलने यावर बंदी घातली आहे. परंतु मा.जिल्हाधिकारी यांचे नियम केजमध्ये धाब्यावर बसवून गेल्या मंगळवार पासून शहरात आठवडी तर सोडा दररोज केज बिड या मुख्य रस्त्यावर भरगच्चपणे बाजार भरवला जात आहे. या बाजारात बऱ्याच प्रमाणात बाजारकरू हे विनामास्क वावरत आहेत. तर अनेक दुकानदार , व व्यापारीही विनामास्कचाचे आपला व्यवसाय करत आहेत. तर खेड्यातील आठवडी बाजार पुर्णपणे बंद केले आहेत. परंतु तालुक्यावर भरगच्च बाजार भरतोय कसा काय ? मा. जिल्हाधिकारी यांनी काढलेले नियम खेड्यासाठीच आहेत की काय? का केज शहरासाठी शिथिल केले आहेत ? असा सवाल आता जनता विचारू लागली आहे. हा बाजार गेल्या मंगळवार पासुन केज शहरात केज बिड या मुख्य रस्त्यावर दररोज भरवला जातो. याला जबाबदार कोण ? यावर नगरपंचायत गप्प का ? मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश केजच्या नगरपंचायला लागु नाहीत काय ? खुलेआम व विनामास्क फिरणाऱ्या जनतेला आता कोण रोख लावणार हे पहाणेही आता तेवढेच गरजेचे आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button