बीड जिल्हा

कोणी काही म्हणा…लाज नाही मला..

युवा पिढी कि दारू पिढी

कित्येक पिढ्या अशा सांगत आले आहेत की, तुम्ही व्यसनाच्या आहारी जाऊ नका मात्र काही केल्या ने, युवा पिढीमध्ये हा बदल झालेला दिसून येत नाही. या बदलाला आता, ” कोणी काही म्हणा…लाज नाही मला..” असेच म्हणावे लागेल.
————————–
शहरी भागासह ग्रामीण भागातही व्यसनाधीन तरुण पिढी पाहायला मिळत आहे, याचा परिणाम ग्रामीण भागातील तरुणावर झाला आहे.
यात २० ते ३० वर्षातील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सिगारेट ओढण्याची जणू फॅशनच झाली आहे. कॉलेज, विद्यापीठ परिसरामध्ये धुम्रपानास मन आई असली तरी अनेक ठिकाणी नियमाची पायमल्ली पाहायला मिळते.
व्यसनामुळे मोठ्या प्रमाणात शारीरिक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याचे जाणून येते. पैशाचा गैरवापर, मार्गदर्शनाचा अभाव, उत्सुकता, संगत या आणि अशा काही कारणामुळे युवा पिढीवर व्यसनाधीनता हा मानसिक रोग होत चालला आहे.
व्यसनाधीन अविवाहित तरुण-तरुणींनी त्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा. व्यसनापासून वेळीच सुटका न घेतल्यास, तुमचे वैयक्तिक आणि सामाजिक जीवन धोक्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुमच्या व्यसनाच्या सवयीमुळे तुम्ही स्वतः सह अनेकाच्या आयुष्याशी खेळत आहात. व्यसनापासून मुक्तता शक्य आहे. त्यासाठी तुमच्या मनावर ताबा मिळवण्याची गरज आहे.
व्यसन एक विनाशकारी वादळ आहे. या वादळात युवा पिढी अडकली आहे.
कितीतरी नवयुवक आणि युवती मादक पदार्थ म्हणजे तंबाखू, सिगरेट,दारू, गांजा,चरस, झोपेच्या गोळ्या इत्यादी. अशा प्रकारच्या कोणत्याही पदार्थाचे अतिरिक्त सेवन करणाऱ्या व्यक्तीला व्यसनी ही पदवी प्राप्त झाली आहे. व्यसनी व्यक्ती स्वतः विनाशाकडे जातच असते आणि त्याच बरोबर लग्न झाल्यानंतर बायको,मुले व आपला परिवार मित्रमंडळी, अशा अगणित कुटुंबांना दुःखात लोटत असतो. व्यसनाधिश तो व्यसनाच्या इतका आहारी गेलेला असतो की, व्यसनापायी ओढून घेतलेली मानसिकता व्यसनाची गुलामगिरी असेच म्हणावे लागेल.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button