बीड जिल्हा

शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी बीड जिल्हा संघटन प्रमुख पदी अक्षय माने यांची नियुक्ती

बीड – शिवसंग्रामची बीड जिल्हा पदाधिकारी कार्यकारणी बैठक आशीर्वाद लॉन्स बीड येथे आ.विनायकराव मेटे साहेब, प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. या कार्यक्रमात गेली अनेक वर्ष विद्यार्थी चळवळीमध्ये काम करणारे, विद्यार्थ्यांचे तरुणांचे व सामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावणारे अक्षय माने यांची शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीच्या बीड जिल्हा संघटन प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
अक्षय माने यांनी याआधी शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पद असताना विद्यार्थ्यांसाठी अनेक आंदोलने, लोकउपयोगी सामाजिक कार्यक्रम तसेच बीड शहरातील अनेक समस्यांवर लोकांसाठी विविध आंदोलन करून त्यांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी प्रयत्न केले आहेत.
यावेळी शिवसंग्राम प्रदेश सरचिटणीस सुदर्शन धांडे, जेष्ठ नेते खालेद पेंटर साहेब, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, प्रभाकर आप्पा कोलंगडे, अनिल घुमरे, सुहास पाटील, राहुल मस्के, नवनाथ प्रभाळे, ढवळे दादा, विनोद कवडे, ज्ञानेश्वर कोकाटे, शेषराव तांबे, जाकीर हुसेन, सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीच्या बीड जिल्हा संघटन प्रमुख पदी निवड प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल अक्षय माने यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button