केजबीड जिल्हा

केज आदर्श पत्रकार समितीच्या वतीने पत्रकार दत्तात्रय दमकोंडवार व सपोउनि महादेव जाधव यांना श्रद्धांजली अर्पण.

केज ,दिवंगत जेष्ठ पत्रकार दत्तात्रय दमकोंडवार आणि सहाय्यक फौजदार महादेव जाधव यांना आदर्श पत्रकार समितीच्या वतीने केज येथील शासकीय विश्राम गृहावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या बाबतची माहिती अशी की, जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार दत्तात्रय दमकोंडवार आणि अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार तथा तत्कालीन केज पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले महादेव जाधव यांचेही कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. त्या दोघांचा आदर्श पत्रकार समितीच्या वतीने दि.१८ मार्च रोजी सकाळी १०:००वा.श्रध्दांजलीच्या कार्यक्रम घेवुन त्यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.या वेळी आदर्श पत्रकार संघाचे सचिव गौतमजी बचुटे आणि संघाचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा.हनुमंतजी भोसले सर यांनी
पत्रकार दत्तात्रय दमकोंडवार आणि महादेव जाधव यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच प्रा.भोसले सर यांनी सांगितले की सर्व पत्रकार बांधवांनी वार्तांकन करताना आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असल्याने कोरोनाच्या काळात स्वतः चीही काळजी स्वतः घेणे फार गरजेचे आहे. तर सर्व पत्रकारांनी आपली व आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्यासाठी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत या योजनेचे प्रमाणपत्र व कार्ड काढून घ्यावे जेणेकरून अडीअडचणीच्या वेळी धावपळ होणार नाही.असे पत्रकार संघाचे जेष्ठ धनंजय कुलकर्णी यांनी सांगतले.
या प्रसंगी संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, प्रा. हनुमंत भोसले, शिवदास मुंडे, धनंजय कुलकर्णी, माजी अध्यक्ष विजयराज आरकडे, धनंजय देशमुख, गौतम बचुटे, महादेव काळे, प्रकाश मुंडे आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button