गेवराईबीड जिल्हा

अमरसिंह पंडितांकडून मुस्लिम समाजाला न्याय

जिल्हा नियोजन समितीवर शेख समशेर यांची निवड

गेवराई:-माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या शिफारशीनुसार बीड जिल्हा नियोजन समितीवर मादळमोही येथील शेख समशेर शेख शब्बीर यांची निवड करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी आ.अमरसिंह पंडित यांनी शेख समशेर यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व देवून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लिम समाजातील पदाधिकार्यांनी अमरसिंह पंडित आणि धनंजय मुंडे यांचे यानिमित्ताने आभार व्यक्त केले.
बीड जिल्हा नियोजन समितीच्या नुतन सदस्यांची नावे दि.१७ मार्चच्या शासन निर्णयानुसार जाहिर करण्यात आली, शासनाने जाहिर केलेल्या पंधरा नियुक्त्यांमध्ये गेवराई विधानसभा मतदार संघातून माजी पंचायत समिती सदस्य शेख समशेर शेख शब्बीर यांचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याचे जाहिर करण्यात आले. मुस्लिम समाजाचे शेख समशेर हे एकमेव सदस्य जिल्हा नियोजन समितीमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडित व बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी त्यांची या पदासाठी शिफारस केली. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या शिफारशीनुसार शेख समशेर यांची नियुक्ती केली. शेख समशेर यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला जिल्हा नियोजन समितीमध्ये प्रतिनिधीत्व देवून समाजाला न्याय दिल्याची प्रतिक्रिया मुस्लिम समाजाकडून व्यक्त केली जात आहे.

गेवराई विधानसभा मतदार संघातील मादळमोही येथील शेख समशेर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कट्टर समर्थक असून यापूर्वी त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेले आहे. माजी आ.अमरसिंह पंडित यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची या भागात ओळख आहे. मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्‍नांवर त्यांनी काम केलेले आहे. जयभवानीचे संचालक राजेंद्र वारंगे, राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक वारंगे, बाजार समितीचे माजी सभापती बबनराव मुळे यांच्यासह मादळमोही व पंचक्रोषीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या निवडीचे स्वागत केले. गेवराई येथे माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीमध्ये शेख समशेर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब मस्के, काँग्रेसचे रविंद्र दळवी, शेख मुजीब, पांडूरंग कोळेकर, सुभाषराव पवळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी यावेळी अमरसिंह पंडित यांचे आभार व्यकत केले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button