जालनामराठवाडा

विजा,गारा,वाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान

शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास गेला वाया

नुकसानीचे पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी

आष्टी:-मागिल तीन चार दिवसांपासून विजा गारा वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
याविषयी अधिक माहिती आशी की,परतूर तालुक्यातील आष्टी सह परिसरात मागील तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे,शेतकऱ्याचे काढणीस आलेली पिके या पावसाने भुईसपाट झाली असून अगोदरच दुष्काळी खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अस्मानी संकटाला तोंड देण्याची वेळ येऊन ठेपली आहे, आष्टी व परिसरातील शेती पाणलोट क्षेत्र बऱ्या पैकी असल्याने या भागात गहू,हरबरा, मोसंबी, केळी,कांदा,ज्वारी,यासह ऊस उत्पादक शेतकरी आहेत,परंतु मागील तीन दिवसांपासून याभागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे यात शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेली गहू,ज्वारी कांदा ही पिकं भुईसपाट झाली असून केळी बागा कोलमडून पडल्या आहेत,टरबूज पिक पुर्णतः उध्वस्त झाले असल्याचे दिसून येत आहे, अवकाळी पावसाने या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अद्याप पर्यंत शासकीय पातळीवरून याबाबत कोणत्याही प्रकारच्या हालचाली सुरू नसल्याचे दिसून येत आहे,अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळेल या अपेक्षेने शेतकरी बघत असून पावसाने झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाने पंचनामे करावे व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button