केजबीड जिल्हा

कोरोनाच्या धास्तीने धास्तावली केज तालुक्यातील जनता.!

लॉकडाऊनच्या बडग्याने केजमधील बाजारपेठा गर्दीने फुल्ल्या.

जिवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड .

==========

महादेव काळे ,केज
गेल्या वर्षापासुन कोरोना महामारीचे संकट हटता हटत नसल्याने कित्येक गोरगरिब देशोधडीला लागले आहेत .तर अनेक जणावर आता उपासमारीची वेळ येवुन ठेपली आहे. या वर्षात ही कोरोना महामारीची दुसरी लाट आली असल्याचे बोलले जात असुन या मुळे जनता भयभीत झाली आहे.
सद्या जिल्यातील कोरोनाची रूग्न संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राजेंद्र जगताप यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्याने सर्वत्र नाराजीचा सुर उमटत आहे.
परंतु आदेश असल्याने त्याचे पालन करणेही आपले आद्य कर्तव्य असल्याने दि.२६ मार्च पासुन लॉकडाऊन सुरु होणार म्हणून तालुक्यातील जनतेने केज शहरात २४ मार्चपासूनच बंद काळात जिवनावश्यक वस्तुची खरेदी साठी एकच गर्दी केली होती. त्यामध्ये किराणा, भाजीपाला , सुक्या भाज्या अशा वस्तु खरेदीसाठी अक्षरशः लोकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे सामाजिक अंतर , मास्क हे नियम पायंदळी तुडवले आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button