गेवराईबीड जिल्हा

जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा गेवराईत सत्कार

माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत संपन्न झाला समारंभ

गेवराई ) बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा गेवराई तालुका सावता परिषदेच्या वतीने माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला.

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनियुक्त संचालक कल्याणराव आखाडे, भाऊसाहेब नाटकर, रविंद्र दळवी आणि अमोल आंधळे यांचा तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेख समशेर यांचा गेवराई तालुका सावता परिषदेच्या वतीने गेवराई बाजार समितीमध्ये गुरुवार दि. २५ मार्च रोजी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, उपसभापती शामराव मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार संपन्न झाला. यावेळी पांडुरंग कोळेकर, आप्पासाहेब खराद, दादासाहेब घोडके, परमेश्वर आंतरकर, बापू गाडेकर, मदन लगड, संतोष अप्पा खोमाड, नगरसेवक श्याम येवले, अँड सर्जेराव मेघारे, शंकर बप्पा तौर, अशोक नाईकवाडे, श्याम काळे, किशोर चव्हाण, परीक्षित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला रमेश साखरे, महादेव कदम, दादासाहेब चौधरी, सदा वादे, सोमनाथ आंतरकर, गायकवाड, आश्विन जवंजाळ, बंडू यादव, गोकुळ खेत्रे, धनंजय वादे,पवन चौधरी, भागवत चौधरी, अशोक गवळी, गणेश काशीद, गणेश काळे, राहुल मस्के, रामेश्वर वादे, कैलास वादे, मच्छिंद्र लेंडाळ, दादासाहेब साखरे, अँड सुनिल भाऊ सुतार, विजय सुतार, अमर नवपुते, राम बोराडे, भागवत घोडके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राऊत सर यांनी तर आभार राधेश्याम लेंडाळ यांनी मानले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा कार्यक्रम घेण्यात आला.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button