बीड जिल्हा

वीज वितरणचा मनमानी कारभार

बीड मधील पथदिव्यांचे बिल चारपट:विजबचत करूनही 20 लाखाचे बिल-नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर

बीड- बीड शहराच्या हद्दवाढीचा विचार करता इतर शहरांच्या तुलनेत फार मोठा विस्तार नाही बीड शहरात पथदिव्यांची संख्या 14 हजाराच्या आसपास आहे शहराच्या मानाने ही संख्या कमीच आहे शेजारी असणाऱ्या जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पथदिवे आणि वीज वापर असताना देखील येथे केवळ सात लाख रुपये बिल आकारले जाते मात्र वीज वितरणच्या मनमानी कारभारामुळे बीड नगरपालिकेला महिन्याला 15 ते 20 लाखाचे बिल आकारले जाते इतर शहरात मीटर रीडींग प्रमाणे बिल देण्यात येते मात्र बीड शहरात अंदाजे आकारणी करून वीजबिल आकारले जाते त्यामुळे वीज बिलाचा आकडा ही वाढतो व जाणीवपूर्वक पथदिवे बंद करून नागरिकांना वेठीस धरले जाते याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन शहरात मीटर रीडिंग नुसार बिल देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केली आहे

बीड शहरात हद्दवाढीसह एकूण क्षेत्रफळ लक्षात घेतले तर केवळ 14000 पथदिवे बीड शहरात आहेत गेल्या दोन वर्षापूर्वी वीज बिलाची बचत व्हावी यासाठी जवळपास 12000 पोलवर एलईडी बल्ब बसवण्यात आले आहेत,त्यामुळे विज बचत मोठ्या प्रमाणावर झाली आहे,पूर्वी याच पोल वर अधिक क्षमतेचे बल्ब होते आता केवळ 18 ते 60 क्षमतेचे (व्हॅट)व काही 75 व 110 व्हॅटचे आहेत, शेजारी असलेल्या जालना जिल्ह्यात पथदिव्यांची संख्या जास्त असताना तेथे केवळ सात लाख रुपये विज बिल आकारले जाते प्रत्येक ठिकाणी मीटर बसवण्यात आले आहेत बीडमध्ये मात्र मागणी करूनही वीज वितरण कंपनीने पत्र दिव्यांना मीटर बसवलेले नाही त्यामुळे अंदाजे बिल आकारले जाते हा आकडा वाढल्यानंतर हे बिल भरणे नगरपालिकेला शक्य होत नाही त्यामुळे जाणीवपूर्वक पथदिवे बंद करून नागरिकांना वेठीस धरले जाते, बीड शहरात मीटर बसून बिल आकारणी करावी यासाठी दोन वर्षापासून पाठपुरावा चालू आहे याबाबत ऊर्जामंत्री यांनादेखील भेटून निवेदन देण्यात आले आहे मात्र वरिष्ठ अधिकारी याची दखल घेत नसल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे बीड शहरात प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र पाचवीत आर बसून मीटर बसवण्यात यावी अशी मागणी देखील वारंवार करण्यात आली आहे पालिकेच्या कार्यालय आतूनही वारंवार पत्रव्यवहार सुरू आहे असे असताना वीज वितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही परिणामी बीड नगरपालिकेकडे मोठ्या रकमेची थकबाकी दाखवली जाते याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी व मीटर बसून मीटर रेडींग प्रमाणे बिला करावी अशी मागणी नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी केली आहे

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button