केजबीड जिल्हा

केज शहरासह तालुक्यात लॉकडाऊनची कडक अमंल बजावणी.

मा.जिल्हाधिकारी यांनी लावलेल्या लॉकडाऊनला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद.

कडक लॉकडाऊनच्या काळातही हिरोगीरी करणारे टुकार विनामास्क रस्त्यावर.

महादेव काळे ,केज.

कोरोनाची वाढती रूग्न संख्या लक्षात घेवुन नुकतीच मा.जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी ही करण्यात आली. त्यास जनतेने ही विनासायास प्रतिसाद देत लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसासाठी यशस्वी केला. यापूर्वीच्या झालेल्या
लॉकडाऊन मध्ये ज्याप्रमाणे वाहतूक शाखेचे पोलीस बंधू चौकाचौकात उभे राहून वाहने अडवून चौकशा करण्याचे जे प्रमाण होते ते आज अत्यंत अल्प प्रमाण पहावयास मिळाले. सर्व बाजारपेठा बंद असून रस्त्यावर शुकशुकाट होता. जिल्हाधिकारी मा रवींद्र जगताप यांच्या आदेशानुसार सर्व बाबींची काळजी घेतलेली दिसत होती. बाजारपेठा, दुकाने बंद असल्यामुळे शुकशुकाट तर होताच परंतु जनतेनेही लॉकडाऊन मनावर घेतलेले पहावयास मिळाले. सर्व औषध दुकाने, दवाखाने चालू असलेले पहावयास मिळत होते. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, इतर कार्यालयात जाणाऱ्या लोकांना ओळखपत्र दाखवून जाण्याची मुभा होती. चौका-चौकात पोलीस बंदोबस्त असून त्यांना मदत करण्यासाठी गृहरक्षक दलाचे जवान, नगर पंचायतचे कर्मचारी, पंचायत समिती व महसुलचे कर्मचारी सोबत आहेत. तसेच तालुक्यात लॉक डाऊनची अंमलबजावणी व कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार मा.दुलाजी मेंडके, गटविकास अधिकारी मा.दत्तात्रय दराडे, केज पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. प्रदीप त्रिभुवन, सपोनि संतोष मिसळे, सपोनि दादासाहेब सिद्धे, सपोनि.श्रीराम काळे, युसुफवडगाव पोलीस स्टेशनचे दहिफळे, विजय आटोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ विकास आठवले, त्यांचे सर्व वैद्यकीय अधिकारी आणि नगर पंचायतीचे मुख्याधिकारी व कर्मचारी स्वतः रस्त्यावर उतरून सदरील लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक कशी करता येईल यावर लक्ष देत आहेत.
ऊपजिल्हा रूग्नालयात मात्र काल शिक्षक , शिक्षणाधिकारी , ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, नगरपंचायतचे कर्मचारी यांनी कोरोनाची तपासणी करण्यासाठी एकच गर्दी केली होती.
तर एवढ्या कडक अंमलबजावणी तही शहरातील काही टुकार वृत्तीचे युवक विनामास्क रस्त्यावर मोटारसायकल वरून स्टाईलमध्ये पहायला मिळाले.यांनाही कुठेतरी चाप बसला पाहिजे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button