बीड जिल्हा

आ.विनायकराव मेटे, व्यापाऱ्यांच्या समस्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात लॉक डाऊन शिथिल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना शिवसंग्रामचे निवेदन.

अत्यावश्यक सेवेंची होणारी साठेबाजी रोखुन नागरिकांची लुटमार थांबवावी

बीड :- संपुर्ण महाराष्ट्रासह  बीड जिल्ह्यामध्ये कोरानाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिनांक 26-03-2021 ते 04-04-2021 या दरम्यान लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. सदरील लॉकडाऊन मुळे बीड शहर व बीड जिल्ह्यामध्ये अनेक वर्गाला आणि घटकाला मोठ्या प्रमाणात त्रास होताना दिसत आहे. आणि सर्व स्तरातुन या लॉकडाऊन विषयी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन जाहीर करत असताना जी नियमावली सर्व वर्गासाठी लागु केली आहे. त्यामधील अनेक नियम व अटी चुकीच्या आहेत, या नियमामुळे व्यापारी वर्गाला, सर्वसामान्य जनतेला त्रास व अडचण होत आहे, असे दिसुन येत आहे. यामधील व्यापारी वर्गाला सकाळी 7 ते 9 दुकाने उघडण्याची परवानगी आपण दिली आहे, व त्याच बरोबर भाजीपाला व फळांची विक्री देखिल सकाळी 7 ते 9 या वेळेतच परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी महोदय, आपण ग्रामीण भागाशी संपर्क असलेले अनुभवी अधिकारी आहात. सकाळी 7 वाजता दुकाने उघडत असतात का? असा खोचक सवाल आ.विनायकरावज मेटे साहेब यांनी जिल्हाधिकारी यांना विचारला आहे.
पुढे दिलेल्या निवेदनात आ.मेटे म्हणतात की, या वेळेत एवढ्या सकाळी कोणीही खरेदी करायला जाऊ शकत नाहीत. आपण सरसकट व्यापारी वर्गाच्या दुकानांना उघडण्यास बंदी घातलेली आहे, हा त्या सगळ्यांवर खुप मोठा अन्याय आहे. मागील संपूर्ण एक वर्ष कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला खुप वाईट गेलेले आहे आणि सर्वांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे काहींचे धंदे बंद झाले तर काहींच्या नौकऱ्या गेल्या आहेत. यामुळे सर्व सामान्य जनतेला अतोनात हाल सोसावे लागले आहे, जिल्हाधिकारी महोदय, आपण लावलेल्या या निर्णयामुळे परत त्यांच्यावर अन्यायच होणार आहे. जिल्हाधिकारी यांनी जे लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. त्यामध्ये शिथिलता देऊन सुध्दा कोरोनावर मात करता येऊ शकते. व्यापाऱ्यांचे दुकान, हॉटेल्स आणि महत्वाच्या सेवा यांना सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंतच्या ऐवजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी. परवानगी देत असताना आपण सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, प्रत्येक टिकाणी सॅनिटायझर व अन्य कोविडशी संबंधीत बाबींची काळजी घेण्याची जबाबदारी हाँटेल मालक, कार्यालय प्रमुख व प्रमुख जबाबदार व्यक्तीवर सोपविण्यात यावी. यामध्ये कोणी हलगर्जीपणा अथवा चुका केल्यास त्याच्या विरुध्द दंडात्मक कार्यवाही करावी. यामध्ये अपवाद फक्त शेतकरी, भाजीपाला विक्रेते व शेतीशी निगडीत असलेले उद्योग किंवा दुकाने यांना सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी. यासोबत अनेक शासकीय बांधकामे सुरू आहेत, ती आर्थिक वर्षामध्ये पुर्ण करणे शक्य होणार नाही. तसेच सर्व सामान्यांच्या घरांच्या बांधकामांना देखिल बंदी घातलेली आहे, ती कामे वेळेत पावसाळ्यापर्यंत पुर्ण होवू शकणार नाहीत, म्हणुन त्यांचा खर्च वाढू शकतो, याकरिता शासकीय व खाजगी बांधकामास परवानगी द्यावी असे ही या निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना शिवसंग्राम जिल्हाप्रमुख सुधीर काकडे, ज्येष्ठ नेते सय्यद नविदुज्जमा, ऊसतोड कामगार नेते बबनराव माने, अशोक सुखवसे, शिवराम शिवगिरे हे उपस्थित होते.


अत्यावश्यक सेवेंची होणारी साठेबाजी रोखुन नागरिकांची लुटमार थांबवावी :- आ. विनायक मेटे

 कोविड-19 चे पेशंटचा मोठ्या प्रमाणात कोविडशी संबंधीत अनेक मंडळी गैर फायदा घेताना दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने कोविड पेशंटला सहजा-सहजी बेड मिळत नाही. बेड मिळाला तर त्याला रुग्णालयाचे बील लाखोच्या घरात येत आहे. याचबरोबर अन्य सॅनिटायझर, मास्क, मेडिसिन व इतर बाबींचे सुध्दा भाव वाढतच आहेत. आत्यावश्यक सेवेमध्ये ज्या बाबी येतात किराणा, भाजीपाला यांच्यावर सुध्दा साठेबाजी होऊ नये म्हणुन लक्ष दिले पाहिजे. या सर्व गोष्टीला पायबंद घालण्यासाठी आपण जिल्ह्यामध्ये कोरोना पेशंटकरिता जे रुग्णालय निश्चित केलेले आहेत, त्यामधील बेड संख्या, खाजगी, सरकारी, निमशासकीय, मेडीकल कॉलेज यामधील बेड या सर्वांचा ताळमेळ घालण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करुन, त्याच्या मार्फत जिल्ह्यातील रुग्णालयाची वर्गवारी करुन त्याच्या सोयी-सुविधा लक्षात घेऊन त्यांचे दर आपण निश्चित करावेत. जे याचे पालन करणार नाहीत त्यांचेवर कारवाई करावी. अशा प्रकारे कोविडशी संबंधीत बाबींचे दर वाढणार नाहीत याची दक्षता घेवून जनतेला दिलासा द्यावा तसेच जिल्ह्यामधील कोविड-19 टेस्ट वाढविण्याचा प्रयत्न करावा त्याचसोबत बीड जिल्ह्यामधील कोविड-19 च्या लसीकरण मोहीमेस गती द्यावी व लसीकरणाच्या नियमावली मध्ये ज्या व्यक्ती बसु शकतील त्या सर्वांना लसिकरण करण्यासाठी प्रोस्ताहीत करावे, असेही आ. मेटे यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button