औरंगाबादमराठवाडा

मराठवाड्याची राजधानी ३० मार्च ते ८ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन

अत्‍यावश्‍यक बाबी /सेवा मर्यादीत स्‍वरुपात व निर्बंधासह सुरु राहतील

औरंगाबाद जिल्ह्यात कलम 144 नुसार संचारबंदी लागु

औरंगाबाद – आरोग्‍य मंत्रालय भारत सरकार व आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण मंत्रालय महाराष्‍ट्र शासन यांनी जाहीर केलेल्‍या मार्गदर्शक सुचनानूसार कोरोनाग्रस्‍त रुग्‍णाच्‍या इतर लोकांनी संपर्कात येवू नये तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे चर्चा करणे, कार्यक्रमाचे आयोजन करणे इ. बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेच्‍या आरोग्‍यास धोका निर्माण होण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे लोकांच्‍या एकत्र येण्‍यास प्रतिबंध करणे आवश्‍यक आहे. त्‍यानुसार जिल्ह्यात वेळोवेळी अंशतः लॉकडाऊनचे आदेश निर्गमित करण्‍यात आलेले आहेत. सद्यस्थितीत औरंगाबाद जिल्‍ह्यात कोव्‍हीड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असून त्‍याचा प्रतिबंध करण्‍यासाठी संपूर्ण औरंगाबाद जिल्‍ह्यात लॉकडाऊन करणे आवश्‍यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी औरंगाबाद व पोलीस आयुक्‍त, ओरंगाबाद (शहर) प्राप्‍त अधिकारानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1)(3) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्‍हयाच्‍या हद्दीपावेतो मंगळवार दिनांक 30.03.2021 चे मध्‍यरात्री 00.00 वाजेपासून ते गुरुवार दिनांक 08.04.2021 चे 24.00 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. सदर मनाई आदेशा दरम्‍यान सोबत जोडलेल्‍या परिशिष्‍ट अ मधील बाबी पूर्णपणे प्रतिबंधित असतील व परिशिष्ठ ब मधील बाबी मर्यादित स्‍वरूपात निर्बंधासह सुरु राहतील.
सदरील आदेश अंमलात असतांना पाच किंवा त्‍यापेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना एकत्र येण्‍यास प्रतिबंध करण्‍यात येत आहे. त्‍याचप्रमाणे अत्‍यावश्‍यक बाबी वगळता नागरिकांची हालचाल पूर्णपणे प्रतिबंधीत राहिल. या आदेशाची अंमलबजावणी व कारवाई करण्यास्तव औरंगाबाद महानगरपालिकेचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी व संबंधीत वार्डाचे वार्ड अधिकारी व त्यापेक्षा वरीष्ठ दर्जाचे महानगरपालिकेचे सर्व संबंधीत अधिकारी, तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्‍त लॉकडाऊन पर्यवेक्षक/मंडळ अधिकारी/अव्‍वल कारकून यांना संबंधीत पोलीस हवालदार व त्‍यापेक्षा वरीष्‍ठ दर्जाचे पोलीस अधिकारी, विविक्षीतपणे नेमलेले अधिकारी/कर्मचारी, ग्राम व नगर विकास विभागाचे सर्व अधिकारी/कर्मचारी आणि महसूल अधिकारी/कर्मचारी या आदेशाची नोंद घेऊन त्‍याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत दक्षता घेतील व आवश्‍यक कार्यवाही करतील. उपरोक्‍त अधिकारी/कर्मचारी यांना पोलीस ठाणे प्रमुखांशी समन्‍वय ठेवून संपूर्ण लॉकडाऊन आदेशाचा भंग करणा-या व्‍यक्‍तीस /संघटना /आस्‍थापना विरुध्‍द गुन्‍हा दाखल करण्‍यास व अनुषंगिक दंडात्‍मक कारवाई करण्‍यास खालील यंत्रणेस प्राधीकृत करण्‍यात येत आहे.
महानगरपालिका हद्दीत – महानगरपालिका, महसूल व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करण्यात आल आहेत.तसेच महाराष्‍ट्र शासनाचे इतर विभाग जसे अन्‍न व औषध प्रशासन, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभाग, परिवहन विभाग, पुरवठा विभाग इत्‍यादींचे अधिकारी यांचा पथकामध्‍ये समावेश राहिल. या संबंधात जिल्‍हाधिकारी यांनी दिलेल्‍या आदेशाप्रमाणे या इतर विभागांचे अधिकारी कार्यवाही करतील.
नगरपालिका/नगरपंचायत हद्दीत – नगरपालिका/नगरपंचायत, महसूल व पोलीस विभाग यांची संयुक्‍त पथके गठीत करण्यात येतील.
गावपातळीवर – ग्रामपंचायत, महसूल व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करण्यात येतील. वरीलप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी (Incident Commander)/ सहायक पोलीस आयुक्‍त यांचेकडे सादर करतील. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी (Incident Commander) / सहायक पोलीस आयुक्‍त यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल.
सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्‍द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल.
वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांच्‍यावर विरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही.

परिशिष्ठ अ
पूर्णपणे प्रतिबंधित बाबी/सेवा

1. कोणत्‍याही परिस्थितीत 5 पेक्षा जास्‍त लोकांनी सार्वजनिक जागेत एकत्र येण्‍यास प्रतिबंध असेल.
2. सार्वजनिक /खाजगी क्रीडांगणे/मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी Morning walk, Evening walk इत्‍यादी प्रतिबंधीत राहिल.
3. उपहार गृह, बार, लॉज, हॉटेल्‍स (कोव्‍हीड-19 करिता वापरात असलेले वगळून) रिसॉर्ट, शॉपींग मॉल, बाजार, मार्केट संपूर्णतः बद राहतील.
4. हॉटेल मधील आसनव्‍यवस्‍थेसह जेवणाची सूविधा (डायनिंग) बंद राहिल मात्र निवासी असलेल्‍या यात्रेकरुना त्‍यांच्‍या खोलीमध्‍ये भोजन व्‍यवस्‍थेस परवानगी राहिल.
5. सर्व केश कर्तनालय/सलुन/ब्‍युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील.
6. शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील. तथापी ऑनलाईन वर्ग सुरु राहतील.
7. स्‍थानिक (Local),सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी परिशिष्‍ठ ‘ब’ मध्‍ये नमूद केलेल्‍या सुट व्‍यतिरिक्‍त संपूर्णतः बंद राहतील. तथापी, अत्‍यावश्‍यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्‍त वाहने व वैद्यकीय कारणास्‍तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर पूर्णवेळ अनुज्ञेय राहिल. अॅटोमध्‍ये फक्‍त 2 प्रवाशांना मास्‍क सह प्रवास अनुज्ञेय राहिल.
8. स्‍थानिक (Local), सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्‍पो, ट्रेलर, ट्रॅक्‍टर इत्‍यादींसाठी संपूर्णतः बंद राहतील तथापी, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे औरंगाबाद महानगरपालिकेचे, पोलिस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणा-या कर्मचारी व वाहनांना सदरच्‍या आदेशानुसार वगळण्‍यात येत आहेत. तसेच अत्‍यावश्‍यक सेवा व वस्‍तु यांचा पुरवठा करणारी घाऊक/ किरकोळ वाहतूक सदरच्‍या आदेशातून वगळण्‍यात येत आहे. सार्वजनिक व खाजगी जीवनावश्‍यक सेवांची तथा इतर वाहतूक (उदा. दूध, किराणा माल,पेट्रोल, डिझेल,गॅस, उद्योगांना इ.)सुरु राहिल.
9. सर्व प्रकारचे बांधकाम / कन्‍स्‍ट्रक्‍शनची कामे संपूर्णतः बंद राहतील, तथापी ज्‍या बांधकामाच्‍या जागेवर कामगारांची निवास व्‍यवस्‍था (On – Site Construction) असेल तरच त्‍यांना काम सुरु ठेवता येईल.
10. सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा,जलतरण तलाव,करमणूक उदयोग, नाटयगृह, बार, प्रेक्षागृह संपूर्णतः बंद राहतील.
11. मंगल कार्यालय, हॉल, लग्‍न समारंभ, स्‍वागत समारंभ, वाढदिवस,लग्‍नाचा वाढदिवस असे कार्यक्रम सार्वजनिकरित्‍या करता येणार नाहीत. या आदेशानुसार लागू करण्‍यात येत असलेल्‍या संचारबंदीच्‍या कालावधीत केवळ नोंदणीकृत विवाह (Registered Marriage) अनुज्ञेय असेल.
12. सामाजिक/राजकीय/क्रीडा/मनोरंजन/सांस्‍कृतिक/धार्मिक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील.
13. धार्मिक स्‍थळे/सार्वजनिक प्रार्थनास्‍थळे संपूर्णतः बंद राहतील. तथापी नियमित दैनंदिन धार्मिक विधी पुजाअर्चा चालू राहतील. याकामी संबंधीत पुजारी/धर्मगुरु/पाद्री इ. यांचेसह फक्‍त एका व्‍यक्‍तीस परवानगी राहिल.
14. सर्व प्रकारचे मोर्चा, धरणे आंदोलन, उपोषण इ. वर निर्बंध राहतील.
15. सर्व देशी/विदेशी वाईन इ.मद्य विक्रीचे दुकाने बंद राहतील.
16. विविध निवडणूकीच्‍या निकालानंतर विजयी मिरवणूकीस बंदी असेल.

परिशिष्‍ठ ब
खालील अत्‍यावश्‍यक बाबी /सेवा मर्यादीत स्‍वरुपात व निर्बंधासह सुरु राहतील.
1. सर्व सामान्‍य नागरिकांसाठी
• परजिल्‍ह्यातून औरंगाबाद जिल्‍ह्यात प्रवेशाकरिता अॅंटिजेन /RT-PCR तपासणी केलेली असणे (जर अशी Test मागील 72 तासामध्‍ये केलेली नसेल तर) बंधनकारक आहे. अॅटिजेन / RT-PCR तपासणी न करता प्रवेश अनुज्ञेय राहणार नाही.
• लसीकरणासाठी पात्र असणा-या व्‍यक्‍तींना लसीकरण केंद्रापर्यंत एकदा जाण्‍यासाठी मुभा राहिल.त्‍यासाठी योग्‍य ते ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्‍यक आहे. वृध्‍दाकरिता लसीकरणासाठी सोबत फक्‍त एक सहायक असण्‍याची परवानगी राहिल.
• वृध्द व आजारी व्यक्तीकरीता नियुक्त केलेले मदतनीस/पेंशटचे Bedside सहाय्यक यांच्‍या सेवा सुरु राहतील. तसेच त्‍यांच्‍या आवागमनास परवानगी असेल.
• नागरिकांनी फक्‍त किराणा /भाजीपाला/दूध इ.खरेदी साठी खालील नमूद वेळामध्‍ये घराबाहेर पडावे. इतर वेळी फक्‍त आपतकालिन वैद्यकीय कारणासाठी किंवा या आदेशात नमूद सुट दिलेल्‍या व्‍यक्‍ती व्‍यतिरिक्‍त घराबाहेर पडू नये.

2. विक्रेते व दुकानदार
• किराणा मालाची ठोक विक्री करणारे दुकाने सकाळी 8.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. किरकोळ विक्रेत्‍यांना दुपारी 12.00 पर्यंत विक्री व घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल. परंतु दुपारी 12.00 नंतर दुकान उघडे ठेवता येणार नाही.
• दूध विक्री व वितरण सकाळी 6.00 ते 11.00 वाजेपर्यंत अनुज्ञेय राहिल. त्‍यानंतर विहित पध्‍दतीने घरपोच पुरवठा सुध्‍दा करता येईल. तथापी दूध संकलन विहीत वेळेनुसार सुरु ठेवता येईल.
• मटन, चिकन, अंडी, मासे इत्‍यादी ची विक्री सकाळी 8.00 ते 12.00 वाजेपर्यंत चालू राहतील. त्‍यानंतर घरपोच विहित पध्‍दतीने सेवा देता येईल.
• भाजीपाला व फळांची विक्री संबंधीत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेने विहीत केलेल्‍या ठिकाणी सकाळी 6.00 ते 11.00 या वेळेत करता येईल. विक्री केंद्रावर सामाजिक अंतर राखण्‍याकरिता आवश्‍यक खुणा/वर्तुळ (Marking) करणे विक्रेत्‍यांना बंधनकारक राहिल. सकाळी 11.00 वाजेनंतर भाजीपाला व फळांची विक्री पूर्णतः बंद राहिल. सर्व नागरिकांना आपल्‍या घराजवळ असलेल्‍या दुकानावर खरेदीला जाणे अपेक्षित आहे.
• ज्‍याठिकाणी ग्राहकांना आत प्रवेश देवून खुली खरेदी केली जाते अशा सुपर मार्केट्स मध्‍ये (डी मार्ट, सुपर मार्केट,बिग बाझार, प्रोझोन मॉल, इत्‍यादी) सकाळी 8.00 ते 12.00 या वेळेत फक्‍त किराणा व भाजीपाला (Grocery), अंडे, मासे, चिकन इ. विक्रीस परवानगी राहिल.तथापी इतर बाबींच्‍या विक्रीवर पूर्णपणे बंदी राहिल. त्‍यानंतर सदरील आस्‍थापना बंद राहतील. परंतु ऑनलाईन/दूरध्‍वनी वरुन प्राप्‍त ऑर्डरनुसार दुपारी 12.00 नंतर घरपोच साहित्‍य वितरीत करता येईल. घरपोच सेवा पुरविणा-या व्‍यक्‍तीस गणवेश व ओळखपत्र रिबीनसह गळ्यात लावणे आवश्‍यक आहे.

3. उद्योग
• सर्व प्रकारचे उद्योग व त्याचे पुरवठादार नियमानुसार चालू राहतील.
• औद्योगिक व इतर वस्तुची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक, शासकीय नियमानुसार सुरु राहिल औरंगाबाद जिल्‍हा औद्योगिक असल्‍याने कच्‍या व पक्‍का मालाची वाहतूक निरंतर करता येईल. औरंगाबाद जिल्‍ह्यातून इतर जिल्‍ह्यात इतर जिल्‍ह्यात जाणा-या माल वाहतूक वाहनांना प्रवेश अनुज्ञेय राहिल. मात्र त्‍यांना जिल्‍ह्यात कोठेही थांबता येणार नाही.
• दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिक यांची छपाई व वितरण व्‍यवस्‍था तसेच डिजीटल /प्रिंटमिडीया यांची कार्यालय शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रांचे वितरण सकाळी 6.00 ते 11.00 या वेळे मध्‍येच अनुज्ञेय राहिल.
• इंटरनेटसारख्‍या संपर्क साधनांसबंधी सेवा पुरविणा-या संस्‍थांना त्‍यांच्‍या आस्‍थापना आवश्‍यकते नुसार सुरु ठेवता येईल.
• सर्व ऑनलाईन सेवा पुरवणिारे CSC नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या वेळेप्रमाणे सुरु राहतील.
• माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्‍थापनांनी शक्‍यतो Work From Home चा पर्याय वापरावा.
• लॉकडाऊन दरम्‍यान सुरु ठेवण्‍यास परवानगी असलेल्‍या आस्‍थापना/कारखाना/दुकाने इत्‍यादी मधील मालक/अधिकारी/ सेवक/कामगार/मजूर यांना दर पंधरा दिवसांनी RT-PCR/ रॅपीड अॅन्टिजेन टेस्‍ट करणे बंधनकारक असून तसे प्रमाणपत्र जवळ ठेवणे आवश्‍यक आहे.
• RT-PCR/ रॅपीड अॅन्टिजेन टेस्‍ट करण्‍याची जबाबदारी संबंधीत आस्‍थापना/दुकान/कंपनी यांची राहिल.

4. रुग्‍णालये व औषधी
• सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील.
• सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील व कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकरणार नाही, अन्यथा संबंधित संस्था कारवाईस पात्र राहिल.
• सर्व औषध दुकाने, ऑनलाईन औषध वितरण सेवा व दवाखान्यात असलेली सर्व औषध विक्री दुकाने त्‍यांच्‍या विहित वेळेनुसार सुरु ठेवता येतील.
• संस्‍थात्‍मक अलगीकरण/विलगीकरण व कोव्‍हीड केअर सेंटर करता शासनाने ताब्‍यात घेतलेल्‍या व मान्‍यता दिलेल्‍या कार्यालयाच्‍या जागा, इमारती नियमानुसार सुरु राहतील.
• रुग्‍णवाहिका व शववाहिका यांना कुठलेही निर्बंध असणार नाही.
• सर्व वैद्यकीय, व्यवसायिक, परिचारीका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व अॅम्बुलन्स यांना रुग्‍णविषयक सेवेसाठी जिल्ह्यातर्गत वाहतुकीसाठी परवानगी राहिल.
• विविध प्रकारच्‍या आरोग्‍य विषयक चाचण्‍यांसाठी खाजगी पॅथॉलॉजीकल लॅबच्‍या तंत्रज्ञास घरी जाऊन स्‍वॅब गोळा करणे इ.साठी परवानगी असेल.
5. e-Commerce
• e-commerce सेवा उदा. Amazon, Flipkart व तत्‍सम सेवा (अत्‍यावश्‍यक व इतर) घरपोच सुरु राहतील.
6. अंत्‍यविधी
• अंत्यविधीसाठी फक्‍त 20 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी असेल.
7. प्रवासी वाहतूक
• बाहेरगावी/परराज्‍य/देशात जाण्‍यासाठी रेल्‍वे/विमानाचे तिकीट बुकींग केले असेल, त्‍यांना प्रवासास परवानगी असेल. सोबत ओळखपत्र व तिकीट असणे आवश्‍यक आहे.सदरील प्रवाशांना RT-PCR/ रॅपीड अॅन्टिजेन टेस्‍ट करणे बंधनकारक राहिल. प्रवाशांनी सदरील चाचणी 72 तासांच्‍या आत केली असल्‍यास सदरील अहवाल सोबत ठेवणे आवश्‍यक आहे.
• महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळ / खाजगी बस सेवेमार्फत नियमित व रात्रीच्‍या प्रवासी वाहतुकीस परवानगी राहिल.
8. कार्यालये (शासकीय/निमशासकीय)
• मा.उच्‍च न्‍यायालय व इतर सर्व न्‍यायालये तसेच राज्‍य शासनाचे/ केंद्र शासनाचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्‍थानिक संस्‍थेची कार्यालये शासन निर्देशानुसार विहीत कर्मचारी मर्यादेनुसार सुरु ठेवता येतील. शक्‍य असल्‍यास Work From Home चा पर्याय वापरण्‍यात यावा. शासकीय कर्मचा-यांसाठी पासची आवश्‍यकता राहणार नाही, तथापी स्‍वतःचे ओळखपत्र रिबीनसह गळ्यात लावणे आवश्‍यक राहिल.
• सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बॅंक नियमानुसार किमान मनुष्यबळासह सुरु राहतील. बॅंकेच्‍या इतर ग्राहकसेवा जसे ऑनलाईन, एटीएम सेवा सुरु राहतील.
• संपूर्ण औरंगाबाद जिल्‍ह्यातील मा.उच्‍च न्‍यायालयाचे मा.न्‍यायाधीश अधिकारी/कर्मचारी, वकील, राज्‍य/केंद्र शासनाचे कर्मचारी शासन अंगीकृत अधिकारी/कर्मचारी, डॉक्‍टर्स, नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, प्रिंटीग व डिजीटल मिडीयाचे पत्रकार व कर्मचारी, फार्मा व औषधी संबंधीत मेडीकल शॉपचे कर्मचारी, दूध विक्रेते, अत्‍यावश्‍यक सेवा जसे कृषि विषयक, गॅस वितरक, पाणी पुरवठा, आरोग्‍य व स्‍वच्‍छता करणारे शासकीय व खाजगी कामगार, अग्निशमन सेवा, जलनिसारण तसेच पूर्व पावसाळी व पावसाळ्या दरम्‍यान करावयाची अत्‍यावश्‍यक कामे करणारे व वीज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच कन्‍टेन्‍मेंट झोन करिता नियुक्‍त कर्मचारी यांनाच चार चाकी, दुचाकी (स्‍वतःकरिता फक्‍त) वाहन वापरण्‍यास परवानगी राहिल. या सर्व कर्मचारी/अधिकारी यांनी स्‍वतःचे कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी ओळखपत्र नसल्‍यास स्‍वतःचे आधार कार्ड रिबीनसह गळ्यात लावणे आवश्‍यक राहिल. वाहन फक्‍त शासकीय कामासाठी अथवा कामाचे जबाबदारीनुसार व शासकीय अथवा संस्‍थेने दिलेल्‍या वेळेतच वापरता येईल.
9. अत्‍यावश्‍यक सेवा
• पेट्रोलपंप व गॅसपंप अत्‍यावश्‍यक सेवेची वाहने, पोलीस, आरोग्‍य, महसूल विभाग, इतर शासकीय विभागांची वाहने, अत्‍यावश्‍यक सेवेत कार्यरत असणारे शासकीय कर्मचारी यांचे वाहने,जीवनावश्‍यक सेवा नागरिकांना घरपोच पुरविणा-या खाजगी आस्‍थापनांचे (घरगुती व वैद्यकीय (Medical Oxygen) गॅस वितरक, पिण्‍याचे पाणी पुरविणारे, इत्‍यादी) वाहने यांनाच इंधन पुरवठा करण्‍यात येईल. मात्र सेवा पुरविणा-या अधिकारी/कर्मचारी यांना स्‍वतःचे ओळखपत्र रिबीनसह गळ्यात लावणे, गणवेश असणे आवश्‍यक राहिल.
• एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार राहिल. कर्मचा-यांना गणवेश, ओळखपत्र रिबीनसह गळ्यात लावणे बंधनकारक राहिल.
• पाणी पुरवठा करणारे (जार इ.) टॅंकर ला दुपारी 12.00 वाजेपर्यंत नियमानुसार परवानगी राहिल.
• स्‍वस्‍त धान्‍य दुकाने पूर्णवेळ सुरु राहतील. त्‍याठिकाणी सामाजिक अंतर राखणे व मास्‍क वापरणे बंधनकारक राहिल.
• अत्‍यावश्‍यक सेवेतील संस्‍था (CSC घरगुती गॅस वितरक, पेट्रोलपंप धारक इत्‍यादी) यांना दैनिक व्‍यवहार किंवा पुरवठादार कंपनीशी आर्थिक व्‍यवहारासाठी बॅंकेत ये-जा करणेसाठी व व्‍यवहार करणेसाठी परवानगी असेल. बॅंकेतील व्‍यवहारासाठी ओळखपत्र रिबीनसह गळ्यात लावणे किंवा आवश्‍यकतेनुसार दोन्‍ही बाबी बंधनकारक राहतील.
• अत्यावश्यक वाहनांना दुरुस्‍ती व साहित्य पुरविणारे अॅटोमोबाईल्स, शेतीसाठीचे फवारणी, वैद्यकीय सेवेतील यंत्र दुरुस्ती दुकाने सकाळी 08.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तसेच वाहनांचे अधिकृत सर्विस सेंटर फक्‍त अत्‍यावश्‍यक सेवेतील वाहनांना (वैद्यकीय सेवेतील, पोलीस व इतर शासकीय यंत्रणेची वाहने व इतर नादुरुस्‍त वाहने) यांना सुविधा पुरवितील. त्‍यांच्‍या कर्मचा-यांना गणवेश व ओळखपत्र रिबीनसह गळ्यात लावणे बंधनकारक राहिल. वाहनांचे वॉशींग सेंटर बंद राहतील.
10. कृषि विषयक
• शेतीच्या मशागतीस मुभा असेल.
• बी-बियाणे, शेतीसाठी लागणारे औषधे, रस्सी, ताडपत्रीची दुकाने सकाळी 8.00 ते 12.00 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. इतर वेळी घरपोच सेवा देता येईल.
• शेतीसाठीचे फवारणी,मशागतीचे साधने यांचे दुरुस्‍ती करणारे व दुरुस्‍ती साहित्‍याची दुकाने सकाळी 8.00 ते 12.00 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.
11. रोजगार विषयक व इतर
• मग्रारोहयोची कामे सुरु राहतील. Covid-19 शिष्‍टाचार पाळून कामाच्‍या ठिकाणी शारीरीक अंतर ठेवावे.
• ILI/SARI सर्वेक्षणासाठी नियुक्‍त ANM/आशा वर्कर/अंगणवाडी सेविका/ग्रामसेवक/तलाठी/शिक्षक यांना त्‍यांचे नेमून दिलेल्‍या कार्यक्षेत्रात आवागमनाची परवानगी असेल.
• सेवाभावी संस्‍था /NGO इ.जे गरजू नागरिकांना जेवण इत्‍यादी मदत देवू इच्‍छीतात ते पूर्व परवानगीने विहीत ठिकाणी व वेळेत हे कार्य करु शकतात.

00000000

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button