बीड जिल्हा

कोविड केअर सेंटर मध्ये तक्रारींचे निराकरण करण्यासाठी नायब तहसीलदार हे नियंत्रण अधिकारी राहणार – जिल्हाधिकारी

बीड ,जिल्ह्यात मार्च 2019 च्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना (covid-19) विषाणूचे संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात आठ ठिकाणी केअर सेंटर चालू केले आहेत. केअर सेंटर मध्ये सुविधांबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सदरील केअर सेंटर मध्ये संक्रमित रुग्णांच्या तक्रारी असतील त्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी खालील तहसीलदारांचे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कोविड केअर सेंटर वर नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहण्यासाठी निर्देशीत करीत आहे असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र जगताप यांनी आदेश दिले आहेत.

 

नियुक्त नायब तहसीलदार यांनी त्यांना नेमून दिलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज करावे. आरोग्य विभाग व इतर विभागांशी समन्वय ठेवून कार्यवाही करावी .कोणत्या प्रकारची हयगय अथवा हलगर्जीपणा करण्यात येऊ नये असे नमूद केले आहे

 

श्री. सुरेंद्र डोके ,नायब तहसीलदार महसूल- 1 तहसील कार्यालय बीड, केअर सेंटर चे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वस्तीग्रह बीड, मो. क्र. _ 94 22 7426 75 , श्री .संजीव राऊत, नायब तहसीलदार पुरवठा तहसील कार्यालय बीड,शासकीय तंत्रनिकेतन मुलांचे वस्तीगृह खंडेश्वरी बीड ,मो.क्र.94 21 31 3170, श्री .विनायक धावणे, नायब तहसीलदार निवडणूक तहसील कार्यालय बीड, तंत्रनिकेतन मुलीचे वस्तीगृह खंडेश्वरी बीड ,मो.क्र. 80 87 51 42 49, श्रीमती लता शिरसाट, नायब तहसीलदार महसूल, तहसील कार्यालय बीड, यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन महाविद्यालय बीड, मो. क्र. 96 89 85 41 31 ,श्री .प्रशांत जाधवर ,नायब तहसीलदार महसूल-1तहसील कार्यालय गेवराई ,कस्तुरबा गांधी शासकीय वस्तीगृह, गेवराई ,मो. क्र.91 68 49 54 81, श्री. प्रदीप पांडुळे, नायब तहसीलदार महसूल -1 तहसील कार्यालय आष्टी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वस्तीगृह आष्टी, मो. क्र.97 63 53 50 03,श्री .खेडकर शिवनाथ ,नायब तहसीलदार महसूल-1 तहसील कार्यालय शिरूर ,समाज कल्याण मुलींचे वसतिगृह शिरूर कासार, मो. क्र.99 22 6220 25 श्री.इंद्रजीत गरड, नायब तहसीलदार, निवडणूक तहसील कार्यालय पाटोदा, समाज कल्याण मुलींचे वसतिगृह पाटोदा ,मो. क्र.99 23 93 61 11 श्री अशोक भंडारी, तहसीलदार महसूल 2 तहसील कार्यालय माजलगाव, समाज कल्याण मुलीचे वस्तीगृह माजलगाव, मो. क्र. 86 68 90 21 77 ,श्री. प्रकाश सिरसेवाड, नायब तहसीलदार महसूल 2 तहसील कार्यालय वडवणी, कस्तुरबा गांधी शासकीय वस्तीगृह वडवणी, मो. क्र. 94 22 56 04 68 श्री .लक्ष्मण धस नायब तहसीलदार महसूल-1 महसूल कार्यालय केज,समाज कल्याण मुलींचे वसतिगृह केज, मो. क्र.98 50 42 83 83, श्री. गणेश सरोदे ,नायब तहसीलदार महसूल- 2 तहसील कार्यालय अंबाजोगाई ,शासकीय नर्सिंग महाविद्यालय लोखंडी, मो. क्र.75 88 53 31 84, श्रीमती क्षितिजा वाघमारे , नायब तहसीलदार महसूल-1 तहसील कार्यालय परळी ,समाज कल्याण मुलींचे वसतिगृह परळी ,मो. क्र.90 28 04 63 14 . उपरोक्त नियुक्त नायब तहसीलदार यांनी त्यांना नेमून दिलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज करावे. असे निर्देशीत केले आहे

राज्य शासनाने कोरोनाविषाणू covid-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 18 97 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून दोन तीन व चार मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे . त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्य क्षेत्रात covid-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.व ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाने covid-19 उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी महाराष्ट्र covid-19 उपाय योजना नियम 2020 यातील नियम 3 नुसार अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषित केलेले आहे व त्यांना कार्यक्षेत्रातील covid-19 व नियंत्रण यासाठी प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button